Maharashtra Politics | कुंभारवाडा येथील शाखेचा डागडुजी व देखभाल वर्षानुवर्षे आम्हीच करत आहोत, असे सांगत शिंदे गटाने या शाखेवर दावा सांगितला. आम्ही बाहेरच्या लोकांना शाखा ताब्यात घेऊ देणार नाही, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली. मात्र, शिवसैनिकही तितकेच आक्रमक होते. त्यामुळे हा वाद चिघळताना दिसत होता. अखेर पोलिसांच्या उपस्थितीत या शाखेला टाळे लावण्यात आले आहे.

 

Shivsena Shakha
ठाण्यात शिवसैनिक आणि शिंदे गटात राडा

हायलाइट्स:

  • ठाण्यात जोरदार राडा
  • शाखेच्या ताब्यावरुन शिवसैनिक आणि शिंदे गटात वाद
ठाणे: दसरा मेळाव्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस आणखी तीव्र होताना दिसत आहे. या दोन्ही गटांकडून शिवाजी पार्क आणि बीकेसीवरील दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते. त्यानंतर आता स्थानिक पातळीवरही या संघर्षाचे पडसाद उमटू लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे परिसरातील कोपरीमध्ये शिवसैनिक आणि शिंदे गटाचे ( कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता.
शिंदे गटातील कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावरच भिडल्या; महिला शिवसैनिकांचा आज भगवी शाल-पुष्पगुच्छ देत गौरव
कोपरीतील कुंभारवाडा परिसरातील शिवसेना शाखेवरुन हा संघर्ष सुरु झाला आहे. या भागातील शिवसैनिक शुक्रवारी कुंभारवाडी येथील शाखेचा ताबा घ्यायला गेले. त्यावेळी तेथील शिंदे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्याला जोरदार विरोध केला. यातूनच शिवसैनिक आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या घटनेची वर्दी मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काहीवेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे मोठा पोलीस फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला होता. कुंभारवाड्यातील शिवसेना शाखा कोणाच्या मालकीची यावरुन दोन्ही गटांमध्ये बराचकाळ वाद सुरु राहिला.
शिंदेंनी बीकेसीवर केवळ मोदी-शहा चालिसा वाचली, आरोप ऐकून नारायण राणेंनीही तोंडात बोटं घातली असतील: शिवसेना
कुंभारवाडा येथील शाखेचा डागडुजी व देखभाल वर्षानुवर्षे आम्हीच करत आहोत, असे सांगत शिंदे गटाने या शाखेवर दावा सांगितला. आम्ही बाहेरच्या लोकांना शाखा ताब्यात घेऊ देणार नाही, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली. मात्र, शिवसैनिकही तितकेच आक्रमक होते. त्यामुळे हा वाद चिघळताना दिसत होता. अखेर पोलिसांच्या उपस्थितीत या शाखेला टाळे लावण्यात आले आहे. या टाळ्याच्या दोन चाव्यांपैकी एक चावी शिवसेना आणि एक चावी शिंदे गटाकडे देण्यात आली आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते याठिकाणी वेगवेगळ्या वेळेत बसतील, असा तोडगा तुर्तास काढण्यात आला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here