अज्ञात माणासाने रानडुकराच्या शिकारीसाठी हा सापळा लावल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. या सापळ्याच नर जातीचा ६ वर्षीय बिबट्या अडकून बळी गेल्याची घटना घडली. काल या परिसरातून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी या ठिकाणी बिबट्या मृत अवस्थेत पडल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. वनाधिकारी आमि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
बुधवारी गुरे चरण्यासाठी गेलेल्या गुराख्यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाला पाचारण केले. सहाय्यक वनसंरक्षक दिपक पवार, वनपारिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे, वनपाल सचिन पुरी,नानासाहेब चव्हाण, सुनिता शिरसाट,रमेश कोळेकर, विलास होले, सुरेश पवार, नौशाद शेख आदींनी घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली. मृत बिबट्याचे राहू येथील पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विकास अधिकारी अनिल इंगवले यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृत बिबट्याचे पिंपळगाव येथील वनक्षेत्रामध्ये दहन केले.
या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपींचा लवकरच शोध घेतला जाईल, असं वनधिकारी कल्याणी गोडस यांनी सांगितले. मृत बिबट्यावर पिंपळगाव येथील वन विभागाच्या जागेत अंत्यसंस्कार करण्याता आला आहे.