मुंबई: पश्चिम आफ्रिकेतील गाम्बिया देशानं भारतीय कफ सिरपविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. गाम्बियामध्ये कफ सिरपमुळे ६६ मुलांचा मृत्यू झाला. हे कफ सिरप भारतीय कंपनीनं तयार केले होते. मुलांच्या मृत्यूनंतर जागतिक आरोग्य संघटनेनं भारतीय कंपनीनं तयार केलेल्या कफ सिरपविरोधात अलर्ट जारी केला. कंपनीच्या चारही कफ सिरपचा वापर न करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेकडून जारी करण्यात आल्या आहेत.

कफ सिरपमुळे ६६ मुलांचा मृत्यू झाल्यानं गाम्बियानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय कंपनीनं तयार केलेलं कफ सिरप जीवघेणं असल्याचं म्हणत गाम्बिया सरकारनं नवी मोहीम हाती घेतली आहे. कफ सिरपविरोधात डोअर टू डोअर कॅम्पेन सुरू करण्यात आलं आहे. लोकांनी तातडीनं आपल्या घरातून सिरप हटवावेत असं आवाहन सरकारनं केलं आहे.
भारतात तयार झालेले ४ कफ सिरप कशामुळे धोकादायक? WHOनं सांगितलं नेमकं कारण
रेड क्रॉस सोसायटीच्या सहकार्यानं आरोग्य मंत्रालयानं कफ सिरपविरोधात अभियान हाती घेतलं आहे. यासाठी सरकार शेकडो तरुणांची मदत घेणार आहे. हे तरुण दारोदारी जाऊन कफ सिरप गोळा करतील. सिरप प्यायल्यानंतर किडणीच्या समस्या निर्माण झाल्यानं ६६ मुलांचा मृत्यू झाल्याचं गाम्बियाच्या आरोग्य संचालिका मुस्तफा बिट्टाये यांनी सांगितलं.

WHOकडून अलर्ट जारी
खोकल्यावरील चार कफ सिरपचा वापर थांबवा, असा अलर्ट जागतिक आरोग्य संघटनेनं जारी केला आहे. प्रोमेथाजिन ओरल सोल्युशन (Promethazine Oral Solution), कोफेक्समालिन बेबी कफ सिरप (Kofexmalin Baby Cough Syrup), मकॉफ बेबी कफ सिरप (Makoff Baby Cough Syrup) आणि मॅग्रीप एन कोल्ड सिरप (Magrip N Cold Syrup) या चार कफ सिरपचा वापर थांबवण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आल्या आहेत. या चारही सिरपची निर्मिती हरियाणास्थित मेडन फार्मास्युटिकल्स कंपनीकडून करण्यात येते.
कितीही खोकला झाला तरी ‘या’ ४ कफ सिरपचा वापर टाळा; ६६ मुलांच्या मृत्यूनंतर WHOच्या सूचना
मेडन फार्म्यास्युटिकल्सनं तयार केलेल्या ४ कफ सिरपमध्ये डायथायलिन ग्लाइकॉल (diethylene glycol) आणि एथिलीन ग्लायकॉल (ethylene glycol) यांचं प्रमाण अधिक आढळून आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात चारही कफ सिरप केवळ गाम्बियातच आढळून आली आहे. मात्र हे सिरप इतर देशांच्या बाजारांमध्येही उपलब्ध असू शकतात. त्यामुळे त्यांचा वापर तातडीनं रोखण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here