मुंबई : सेबीच्या नवीन नियमामुळे ब्रोकरेजचा खर्च वाढणार आहे. हे नवीन नियम आजपासून लागू झाले आहेत. या नियमानुसार ब्रोकरला दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी किंवा प्रत्येक तिमाहीच्या पहिल्या शुक्रवारी (निवडलेल्या पर्यायानुसार) त्यांच्या ग्राहकांचे ट्रेडिंग अकाउंट स्क्वेअर-ऑफ करावे लागतील. हे ग्राहकांनी निवडलेल्या पर्यायावर (मासिक किंवा त्रैमासिक) अवलंबून असेल. हा नियम आजपासून लागू होणार आहे.

शेअर बाजार, उद्योग प्रतिनिधींशी सल्लामसलत केल्यानंतर आणि दुय्यम बाजार सल्लागार समितीशी चर्चा केल्यानंतर सेबीने या वर्षी जुलैमध्ये खाते सेटलमेंट चालविण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. आपल्या परिपत्रकात, सेबीने असे म्हटले आहे की, ‘यामुळे ग्राहकांच्या पैशाचा गैरवापराचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे.’ या नियमाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी! सेबी कडून IPO नियमांत बदल, तुमच्यावर काय परिणाम होईल
काय आहे सेबीचा नवीन नियम
तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमधील कोणतीही शिल्लक (उपयोग न केलेली) तुम्ही निवडलेल्या दिवशी ब्रोकर तुमच्या बँक खात्यात पुन्हा हस्तांतरीत करेल. म्हणजेच तुम्ही शेअर्स खरेदीसाठी वापरलेल्या रकमेनंतर डीमॅट खात्यातील शिल्लक रक्कम तुम्ही निवडलेल्या पर्यायाच्या दिवशी ब्रोकर तुमच्या बँक खात्यात हस्तांतरीत करून पूर्णतः सेटलमेंट करेल. म्हणजेच ब्रोकरशी असलेले देणे घेण्याचे व्यवहार शुन्य होतील. आणि सोमवारपासून नवीन व्यवहार सुरू होतील.

गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; गुंतवणुकीविषयक आता चोवीस तास तक्रार करता येणार
या नियमामुळे ब्रोकरेज खर्चात वाढ होऊ शकते. कारण त्यामुळे ब्रोकर्सला खेळत्या भांडवलाची गरज वाढेल. मात्र, ग्राहकांचे हित लक्षात घेऊन सेबीने हा नियम लागू केला आहे. सेबीच्या म्हणण्यानुसार याद्वारे ब्रोकर ग्राहकांच्या ट्रेडिंग अकाउंटमधील पैशाचा गैरवापर करू शकणार नाही. याबाबत कामत यांनी ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “या नियामक बदलांमुळे पुढील काही वर्षांत ब्रोकरेजचे दर वाढतील. हे बदल ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी चांगले आहेत, परंतु त्यामुळे ब्रोकिंग उद्योगाची भांडवलाची गरज वाढेल.”

ब्रोकर्सवर काय परिणाम होईल
तुम्ही डीमॅट खात्यात पैसे हस्तांतरीत केल्यावर तुम्हाला शेअर्स खरेदी करता येतात. तसेच असलेले शेअर विकल्यावर नवीन खरेदी करता येते. परंतू ब्रोकर्सने तुम्हाला पैसे हस्तांतरीत करणे आणि तुम्ही शेअर्सची विक्री करणे या दोन्हींच्या व्यवहार पूर्ण होण्यासाठी एक दिवसाचा वेळ जातो. त्यामुळे तुम्हाला पुढील व्यवहारासाठी सोमवारची वाट पाहावी लागेल. या नियमांमुळे ब्रोकर्सजवळील खेळते भांडवल कमी होईल. अशी चिंता ब्रोकरेज फर्मला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here