उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पार पडलेल्या दसरा मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवर हजेरी लावली. संपूर्ण शिवाजी पार्क शिवसैनिकांनी फुलून गेलं होतं. सुमारे तासाभराच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजप, आरएसएस, शिंदे गटावर तुफान हल्लाबोल केला. तसेच फुटीरांना धडा शिकवण्यासाठी मला साथ द्या, असं आवाहन त्यांनी उपस्थित शिवसैनिकांनी केला. ठाकरेंच्या याच भाषणाची चिरफाड करण्यासाठी राणेंनी पत्रकार घेतली.

union Minister BJP Leader narayan Rane Slam Uddhav Thackeray Over Dasara melava Speech
नारायण राणे-उद्धव ठाकरे-पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुनावलं होतं. ज्या पक्षाचा नेता पाकिस्तानला जाऊन केक खाऊन येतो, त्यांच्याकडून आम्हाला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही, अशा शब्दात त्यांनी मोदी आणि भाजपवर शरसंधान साधलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या याच टीकेला केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांनी उत्तर दिलंय. “मोदी पाकिस्तानला केक खायला गेले तर बिघडलं कुठे? एका देशाच्या पंतप्रधानांनी दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाला गेलं तर बिघडलं कुठे? तुला मुख्यमंत्रिपद कळलं नाही, हा विषय पण तुला कळणार नाही..”, अशा शब्दात नारायण राणेंनी ठाकरेंचा समाचार घेतला. “राजनैतिक संबंध नावाचा प्रकार असतो, ते तुला नाही समजायाचं… मोठ्या माणसांवर टीका केली म्हणजे तू मोठा होतो असं नाही…”, असंही राणे म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंना मी अहोजाहो करणार नाही, असंही त्यांनी ठासून सांगितलं.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पार पडलेल्या दसरा मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवर हजेरी लावली. संपूर्ण शिवाजी पार्क शिवसैनिकांनी फुलून गेलं होतं. सुमारे तासाभराच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजप, आरएसएस, शिंदे गटावर तुफान हल्लाबोल केला. तसेच फुटीरांना धडा शिकवण्यासाठी मला साथ द्या, असं आवाहन त्यांनी उपस्थित शिवसैनिकांनी केला. ठाकरेंच्या याच भाषणाची चिरफाड करण्यासाठी राणेंनी पत्रकार घेतली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here