शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) अपात्र ठरलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केले आहेत.
शिक्षक आमदार नागो गाणार यांनी नुकतीच जगताप यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. जगताप यांनी लेखी सूचना जारी करून संस्थाचालकांना टीईटी अपात्र शिक्षकांवर परस्पर कारवाई करता येणार नाही असे स्पष्ट केले. शिक्षकांच्या सेवासमाप्तीचे आदेश देण्याचे काम हे विभागीय शिक्षण उपसंचालकांचे असून त्यांच्या परवानगीशिवाय राज्यातील एकाही टीईटी अपात्र शिक्षकाला सेवेतून काढता येणार नाही, असेही जगताप यांनी म्हटले आहे.
सुनावणी घेऊनच सेवासमाप्तीबाबत कार्यवाही
टीईटी अपात्र शिक्षकांची सुनावणी घेऊनच त्यांची सेवासमाप्तीबाबत कार्यवाही होणार आहे. सदर सुनावणी ही विभागीय शिक्षण उपसंचालकांसमोर पार पडणार आहे. शिक्षण उपसंचालक सदर शिक्षकाचे नाव, शाळेचा प्रकार, शैक्षणिक, व्यावसायिक पात्रता, टीईटी परीक्षा किती वेळा दिली, अपात्र किती वेळा ठरले तसेच सदर शिक्षकाच्या नेमणुकीबाबत न्यायालयीन प्रकरण सुरू आहे का याची शहानिशा करूनच शिक्षण उपसंचालक त्या शिक्षकाला सेवासमाप्तीचे बोलके आदेश (spejdderJing orders) देणार आहेत. या आदेशानुसारच संबंधित शिक्षणसंस्थेने शिक्षकांवर सेवासमाप्तीची कार्यवाही करायची आहे.