चंदिगडः चंदिगडमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सॅनिटायजरचा उपयोग करून एका २२ वर्षाच्या तरुणाने गर्लफ्रेंडला पेटवलं. तिने २००० रुपये उसने देण्यास नकार दिल्याच्या रागातून त्याने गर्लफ्रेंडवर हल्ला केला. या घटनेत तरुणी २० टक्क भाजली असून तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमी झालेली तरुणी ही मूळची शिलाँगची आहे.

ही घटना ६ आणि ७ जुलैच्या दरम्यान घडली. आरोपीचं नाव नरेश असं आहे. त्याने गर्लफ्रेंड दामिनीकडे (बदललेलं नाव) २००० हजार रुपये उसने मागितले होते. पण तिने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापातून त्याने तिच्यावर चेहऱ्यावर सॅनिटायजर फेकले. त्यानंतर आपल्याकडील लायटरने तिला पेटवले. ही घटना शेजाऱ्यांना कळताच त्यांनी पीडित मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिच्यावर उपचार करण्यात आले.

लिव्ह इनमध्ये राहात होते

दामिनी ही २०१९ मध्ये चंदिगडमध्ये आली होती. यानंतर तिची चंदिगड येथील बुरेलच्या नरेश मैत्री झाली. यानंतर ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते.

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर या प्रकरणी पीडित तरुणीने नरेश विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पैशासाठी नरेश सतत आपल्याला मारहाण करत होता, असं तिने पोलिसांना सांगितलं. तरुणीच्या तक्रारीवरून नरेश विरोधात पोलिसांनी कलम ३४२, ३२४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी कारवाई करत नरेशला शनिवारी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दुसरी घटनाः एक्स गर्लफ्रेंडची चाकूने भोसकून केली हत्या

ही घटना गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील आहे. गेल्या महिन्यात ही घटना घडली होती. पीडितेचे नाव भावना गोस्वामी असे होते. भावना आणि आरोपी संजय यांची मैत्री होती. पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. पण पुन्हा मैत्री करण्यासाठी संजय तिच्या मागे लागला होता. मात्र तिने नकार दिला आणि दुसऱ्याबरोबर मैत्री केली. याच रागातून संजयने तिची भर बाजारात चाकूने भोसकून हत्या केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here