जिवंत रुग्णाला बॉडीबॅगमध्ये भरुन शवागारात ठेवल्याचा आरोप एका रुग्णालयावर झाला आहे. या बेजबाबदारपणामुळे ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणात रुग्णालयातील कर्मचाऱ्याची चौकशी सुरू केली आहे. ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये ही घटना घडली.

केविन यांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठीची प्रक्रियादेखील पूर्ण झाली होती. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचं एक पथक त्यांच्या मृतदेहाची तपासणी करण्यासाठी पोहोचलं. केविन रीड यांच्या मृतदेहाचे डोळे उघडे होते असं डॉक्टरांच्या लक्षात आलं. केविन यांच्या तोंडातून रक्त निघालं होतं. रक्त ताजं होतं. त्यामुळे डॉक्टरांना शंका आली.
डॉक्टरांनी नर्सकडे मृत्यूचं प्रमाणपत्र मागितलं. मात्र तिला प्रमाणपत्र देता आलं नाही. रुग्णालयातील डॉक्टरांनी रीड यांना मृत घोषित केलंच नव्हतं. त्यामुळे नर्सकडे प्रमाणपत्रच नव्हतं. शवागाराची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना घडलेला प्रकार लक्षात आला. रुग्ण बहुधा जिवंत होता आणि त्यानं बॉडी बॅगेतून बाहेर पडण्यासाठी धडपड केली, असं तपास पथकातील एका सदस्यानं सांगितलं. रुग्णानं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला आणि श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती सदस्यानं दिली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.