माझ्या भाचीला भीती वाटत होती. तिच्या आवाजावरून तसं स्पष्ट समजत होतं, असं गुरप्रीत कौर यांनी पोलिसांना सांगितलं. कामावर असताना ब्रेक घेतला त्यावेळी गुरप्रीतनं मला कॉल केला होता. सासरे आपल्या कार जवळ येत आहेत आणि मला खूप भीती वाटत आहे, असं त्यावेळी ती म्हणाली होती. या कॉलनंतर ५ तासांनी वॉलमार्टमधील तिच्या सहकाऱ्याला तिचा मृतदेह आढळून आला. तिला २ गोळ्या लागल्या होत्या.
गुरप्रीत घटस्फोट घेण्याच्या तयारीत होती. त्याची प्रक्रिया सुरू होती. तिचा पती आणि सासरे फ्रेन्सोमध्ये राहतात. तर गुरप्रीत सॅन जोसमध्ये वास्तव्यास आहे. पोलिसांनी पार्किंग परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात सितल यांचा काळ्या रंगाचा पिकअप ट्रक पार्किंगमध्ये शिरताना दिसला. सितल यांनी त्यांचा ट्रक सुनेच्या कारच्या बाजूला उभा केला.
पोलिसांनी सितल दोसांज यांचं लोकेशनही तपासलं. हत्या झाली त्यावेळी त्यांचं लोकेशन सॅन जोस होतं. पुढच्या काही तासांत ते फ्रेन्सोला पोहोचले होते. सितल यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली. त्यात .२२ कॅलिबरचं पिस्तुल सापडलं. पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.