औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. मिरची चौकात पहाटेच्या सुमारास खासगी बसला अचानक आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय.

 

nashik bus fire
नाशिकः औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. मिरची चौकात पहाटेच्या सुमारास खासगी बसला अचानक आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. (Nashik Bus Fire)

नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा भीषण अपघात घडला आहे. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या अपघाताची पुष्टी केली आहे. ही बस यवतमाळहून मुंबईकडे निघाली होती. मात्र वाटेतच बसला आग लागली. या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

वाचाः ठाकरे गटाला अंतिम मुदत?; निवडणूक आयोग धनुष्यबाणाबाबत लवकरच निर्णय घेणार

शनिवारी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. तसंच, बचावकार्य सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.

वाचाः मुख्यमंत्री शिंदेंविरोधात हायकोर्टात याचिका; दसरा मेळाव्याच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here