nashik bus accident, नाशिक बस अपघातावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; मदतीची घोषणा करताना पाहा काय म्हणाले… – chief minister eknath shinde big announcement on nashik bus accident ten people life ends in the rush
नाशिक : औरंगाबादमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. मिरची चौकात खासगी बसचा अपघात झाल्यानंतर बसने अचानक पेट घेतला. ही आग इतकी भयंकर होती की यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. तर या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे, ते माध्यमांशी बोलत होते. (Nashik Bus Fire)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या अपघाताविषयी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, ‘सर्व पोलीस अधिकारी आणि एसपी यांच्याशी बोलणं झालं असून एकूण ११ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर ३८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून खासगी रुग्णालयातूनही मदतीच्या सूचना दिल्या आहेत. महापौर घटनास्थळी आहेत. जिल्हाधिकारांशी बोललो. या अपघाताची चौकशी केली जाईल तर सध्या जखमींना मदत करण्यास प्राधान्य दिले आहे. सर्व उपचार शासनाच्या वतीने केला जाईल तर मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये देण्यात येईल’ अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नाशिकमध्ये मोठी दुर्घटना! खासगी बसला भीषण आग; दहा प्रवाशांचा होरपळून मृत्यू नेमका कसा झाला अपघात…
नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा भीषण अपघात घडला आहे. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या अपघाताची पुष्टी केली आहे. ही बस यवतमाळहून मुंबईकडे निघाली होती. मात्र, वाटेतच बसला आग लागली. या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
एसटी महामंडळाकडून सर्व प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, बसमध्ये बसण्याआधी नक्की वाचा ही बातमी… शनिवारी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. तसंच, बचावकार्य सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. दहा मयत पुरुष असून २१ प्रवाशी जखमी आहे. यापैकी एकजण गंभीर जखमी आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयातून दुसरीकडे पुढील उपचारांसाठी हालवण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाधरन डी यांनी दिली आहे.
सकाळी झोपेत असताना गाडी दुसऱ्या गाडीला धडकली. काही समजण्यापूर्वीच आग लागली. मी खिडकीतून उडी मारत बाहेर निघाल्याने जीव वाचला. सोबत तीन लहान मुली होत्या. सुदैवाने त्यांचेही प्राण वाचले. अग्निशमन यंत्रणा वीस मिनिटांनी पोहोचली, अशी माहिती एका प्रवाशाने दिली आहे.