नाशिक : औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. मिरची चौकात पहाटेच्या सुमारास खासगी बसला अचानक आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मयतांमध्ये सर्व पुरुषांचा समावेश आहे. या अपघातात २१ प्रवाशी जखमी आहे तर १ गंभीर जखमी आहे. या भीषण अपघातानंतर अपघातानंतर काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया येत आहेत. (Nashik Bus Fire)

सकाळी मी झोपेत असताना गाडी दुसऱ्या गाडीला धडकली. काही समजण्यापूर्वीच आग लागली. मी खिडकीतून उडी मारत बाहेर निघाल्याने जीव वाचला. सोबत तीन लहान मुली होत्या. सुदैवाने त्यांचेही प्राण वाचले. अग्निशमन यंत्रणा वीस मिनिटांनी पोहोचली.
अनिता सुकदेव चौधरी, रा.लोणी, वाशीम

मुख्यमंत्री शिंदेंविरोधात हायकोर्टात याचिका; दसरा मेळाव्याच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी
मामा आणि काकांसोबत जात असताना गाडीचा अपघात झाला. आम्ही खिडकीतून उड्या घेतल्या. आम्ही कल्याणला जात होतो. मामा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. माझी प्रकृती ठीक आहे. अतिशय भयंकर अपघात होता. आम्ही वाचलो हेच सुदैव.
पिराजी सुभाष धोत्रे, रा. अरणी, यवतमाळ

दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवर हे घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी झोन-१च्या सगळ्या पोलिस ठाण्यातील पथके कामाला लावली आहेत. ३ पथके घटनास्थळी. उर्वरित तीन टीम जिल्हा रुग्णालयात. पंचनामा आणि पुढील कार्यवाही सुरु आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे तर जखमींचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचं शिंदेंनी सांगितलं आहे.

ठाकरे गटाला अंतिम मुदत?; निवडणूक आयोग धनुष्यबाणाबाबत लवकरच निर्णय घेणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here