नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसानच्या १२व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी मोदी सरकार लवकरच देशभरातील १२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये ट्रान्सफर करणार आहे. सध्याच्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा १२वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. केंद्र सरकार १७ आणि १८ ऑक्टोबर २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, पैसे हस्तांतरित करण्याच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

शेतकऱ्यांसाठी केंद्राची विशेष योजना; दरमहा करा फक्त ५५ रुपये जमा अन् ३ हजार रुपये पेन्शन मिळवा
उशीर का होतोय?
योजनेतील अनियमितता टाळण्यासाठी सरकारने लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ई-केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट ठेवण्यात आली होती मात्र, शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले नसल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना १२व्या हप्त्याचे पैसे मिळण्यास विलंब होत आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर, पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जाऊन लवकरात लवकर तुमचे ई-केवायसी पूर्ण करून घ्या, जेणेकरून त्वरित १२व्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.

PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटली, यामध्ये तुमचे नाव नाही… पाहा कसे चेक करणार
यादीत तुमचे नाव आहे की नाही कसे चेक करणार

  • सर्वप्रथम PM किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर जा. होम पेजवर मेनूबारवर जा आणि ‘फार्मर कॉर्नर’ वर जा.
  • येथे लाभार्थी यादीवर क्लिक/टॅप करा. हे केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक पेज ओपन होईल.
  • येथे तुम्ही राज्यातील ड्रॉप-डाउन मेनूमधून तुमचे राज्य निवडा.
  • यानंतर दुसऱ्या टॅबमध्ये जिल्हा, तिसऱ्या टॅबमध्ये तहसील किंवा उपजिल्हा, चौथ्यामध्ये ब्लॉक आणि पाचव्या क्रमांकावर तुमच्या गावाचे नाव निवडा.
  • यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक करताच संपूर्ण गावाची यादी तुमच्या समोर येईल.

PM किसान योजनेत बोगस शेतकऱ्यांनी धुतले हात; सरकारच्या मोहिमेनंतर लाभार्थी संख्येत लक्षणीय घट
पीएम किसान सम्मान निधी योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी दोन हजार रुपयांची (दरवर्षी ६००० रुपये) आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११ हप्त्याची रक्कम जमा झाली असून आता १२वा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here