मुंबई: कर्नाटक, मध्यप्रदेशनंतर आता राजस्थानमध्येही सुरू आहे. महाराष्ट्रातही ‘ऑपरेशन लोट्स’ राबवलं जाण्याच्या जोरदार चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या या ऑपरेशन लोट्सवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी सडकून टीका केली आहे. ‘ऑपरेशन कमळ’ दुसरं तिसरं काही नसून सरळ सरळ सत्तेचा गैरवापर आहे. केंद्राच्या सत्तेचा पुरेपूर गैरवापर करणं म्हणजेच आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.

शरद पवार यांनी शिवसेना नेते यांना शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’साठी दणदणीत मुलाखत दिली. या मॅरेथॉन मुलाखतीमध्ये त्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. केंद्रात सत्तेत आल्यापासून भाजप सरकारने सुरू केलेल्या ऑपरेशन लोट्सचं पवारांनी त्यांच्या खास शैलीत ऑपरेशन केलं. ऑपरेशन कमळ हे दुसरे तिसरे काहीच नाही. सत्तेचा सरळ सरळ गैरवापर आहे. लोकांनी निवडून दिलेली सरकारं दुबळी करण्यासाठी, अस्थिर करण्यासाठी केंद्राच्या सत्तेचा पुरेपूर गैरवापर करणं म्हणजे ऑपरेशन कमळ आहे, असं पवार म्हणाले.

ऑपरेशन लोट्सनुसार महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा असल्याचं राऊत यांनी पवारांना विचारलं. त्यावर ठाकरे सरकार पाडलं जाणार हे मीही ऐकूनच आहे. पहिल्यांदा तीन महिन्यात हे सरकार पाडणार असल्याचं सांगितलं जात होतं. आता सहा महिने झाले. काही लोकांनी सप्टेंबरचा वायदा केलाय. तर काही लोक ऑक्टोबरचा वायदा सांगत आहेत, असे चिमटे काढतानाच माझी खात्री आहे हे सरकार पाच वर्षे उत्तमरित्या राज्य करेल आणि ऑपरेशन कमळ असो वा अन्य काही असो त्याचा काहीही परिणाम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर होणार नाही, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

दरम्यान, पवारांनी कालच्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागातही ठाकरे सरकारची वरेमाप स्तुती केली होती. उद्धव ठाकरे सरकार सहा महिन्याच्या परीक्षेत पास झाल्याचं कौतुक पवारांनी केलं होतं. आता कोठे लेखी परीक्षा झाली आहे, पण त्या परफॉर्मन्सवरून तरी प्रॅक्टिकलमध्येसुद्धा हे सरकार यशस्वी होईल असा आता ट्रेंड दिसतोय. दुसरं महत्त्वाचं म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांच्या कालखंडासंबंधी लगेचच निष्कर्ष काढणं योग्य नाही. शिवाय विद्यार्थी कष्ट घेताना दिसतोय. त्यामुळे निकालाची चिंता बाळगावी अशी स्थिती दिसत नाही. राज्याचा विचार करून तुम्ही विचारत असाल तर या सहा महिन्यांत परीक्षेत आमचा विद्यार्थी संपूर्ण पास झाला आहे. तो पुढची परीक्षा, पुढचे पेपरही सहजपणाने सोडवेल अशी खात्री आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here