Pune Accident News : महामार्गाच्या जवळ दुचाकीवर उभ्या असलेल्या तरुणाला एका मालवाहू पिकअपने मागून धडक दिली. या अपघातात सदर तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

pune bike accident
पुणे अपघात
चाकण (पुणे) : दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच कोणाला मृत्यू कुठे गाठेल, हेही सांगता येत नाही. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांनी सावधानता बाळगली पाहिजे. चाकण परिसरातील आंबेठाण चौकात अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. महामार्गाच्या जवळ दुचाकीवर उभ्या असलेल्या तरुणाला एका मालवाहू पिकअपने मागून धडक दिली आणि त्यानंतर सदर तरुण हवेत उडाला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

नाशिक महामार्गावर हा अपघात घडला आहे. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून संतोष पाचरणे असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे.

नाशिक : त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांचे निधन

नेमकं काय घडलं?

पुणे-नाशिक महामार्गावर चाकण आंबेठाण चौकात महामार्गालगत एक तरुण आपल्या दुचाकीसह उभा होता. मात्र थोड्या वेळाने आपल्यासोबत काय घडेल याची त्याला किंचितही कल्पना नव्हती. दुचाकीवर उभा असलेल्या या तरुणाला पिकअप मालवाहू गाडीने मागून येऊन धडक दिली. हा अपघातात तरुण गंभीररीत्या जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here