तुळजा भवानी मंदिर संस्थानला या मार्गाने देणगी स्वरुपात उत्पन्न मिळालं आहे.
१) रोख देणगी – १ कोटी ६७ लाख ९६ हजार २०० रुपये
२) सिंहासन पेटी- १ कोटी ५ लाख ३७ हजार ९७० रुपये
३) दानपेटी – ७२ लाख ६३ हजार ३० रूपये
४) विश्वस्त निधी- १८ लाख २१ हजार ३७५ रुपये
५) मनी आँर्डर – २ लाख ४६ हजार ३३५ रूपये
६) नारळ विक्री – २ लाख ४४ हजार ७०० रुपये
७) धनादेश देणगी – ८७ हजार ४६९ रुपये
८) ऑनलाईन देणगी – ५१ हजार
९) नगदी अर्पण – २२ हजार ११४ रुपये
१०) गोंधळ जावळ – १० हजार १६० रुपये
११) आराध शुल्क – ४ हजार ९८३ रुपये
१२) पुस्तक विक्री – १ हजार ९२८ रुपये
१३) कल्लोळ स्वच्छता – १ हजार ५० रुपये
१४) फोटो विक्री – ९५० रुपये
१५) प्राणी विक्री – ६७० रुपये
१६) भोगी – ६५० रुपये
१७) चरणतिर्थ प्राप्ती – ४०८ रुपये
१८) ग्रिटिंग कार्ड – ४४.६४
या माध्यमातून तुळजा भवानीला उत्पन्न मिळालं आहे. करोनाच्या निर्बंधामुळे २ वर्ष तुळजा भवानीचे उत्सव हे साधेपणाने साजरे करण्यात आले होते. शिवाय भक्तांना यायला निर्बंध असल्यामुळे भक्तांविना उत्सव साजरे झाले होते. या वर्षी सरकारने निर्बंध पूर्णपणे शिथिल केल्यामुळे लाखो भाविकांनी तुळजा भवानीच्या चरणी डोके टेकवले आहे.