मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित वनडे मालिकेसाठी भारतीय वरिष्ठ निवड समितीने दीपक चहरच्या जागी वॉशिंग्टन सुंदर याची निवड केली आहे. इंदोरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यानंतर चहरला पाठीची दुखापत झाल्याने आणि लखनऊमधील पहिल्या वनडे सामन्यात तो भारताच्या अंतिम अकरामध्ये सहभागी झाला नव्हता.

दीपक चहर (Deepak Chahar) आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे (एनसीए) जाणार आहे आणि तेथील वैद्यकीय पथक त्याच्यावर देखरेख ठेवेल, अशी माहिती बीसीसीआयने निवदेन जाहीर करत दिली आहे.

जयदेव ठाकरेंच्या सुपुत्राचा उद्धव काकांना पाठिंबा, शिवसेना वाढवण्यासाठीही इच्छुक
वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याने भारताकडून शेवटचा सामना फेब्रुवारीमध्ये खेळला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्या वनडे सामन्यात त्याने ४ षटके गोलंदाजी केली होती. ज्यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. तसेच त्याने भारताकडून आतापर्यंत ४ वनडे सामने खेळताना ५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ४ कसोटी सामन्यामध्ये ६ विकेट्स घेत २६५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने २१ आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळताना २५ विकेट्स घेतल्या आहेत. भारत ९ ऑक्टोबरला रांची येथे दुसरा वनडे सामना खेळेल आणि ११ ऑक्टोबरला नवी दिल्ली येथे मालिकेतील अंतिम वनडे सामना खेळणार आहे.

भारताचा वनडे संघ : शिखर धवन (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर.

मुंबईतील कुर्ल्यात इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून बचाव कार्याला सुरुवात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here