दिवाळीच्या दिवशी (२४ ऑक्टोबर २०२२) शेअर बाजार बंद राहणार असले तरी, तरीही गुंतवणूकदारांना शेअर खरेदी करण्याची संधी मिळेल. दिवाळीच्या मुहूर्तावर बीएसई आणि एनएसई मुहूर्त ट्रेडिंगसाठी एक तास खुले असतील. या प्रसंगी आपण शेअर्स खरेदी करू शकता. दिवाळी हा धनाची देवता म्हणजेच लक्ष्मीच्या पुजनाचा सण असतो. या निमित्ताने शेअर्स खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळेच शेअर बाजारात तासाभराचा व्यवहार सुरू ठेवण्यात येतो.
यंदाच्या मुहूर्त ट्रेडिंगची वेळ कोणती?
२४ ऑक्टोबर २०२२ रोजी म्हणजेच सोमवारी दिवाळी-लक्ष्मी पूजनानिमित्ताने बंद राहिल. सध्या एक्सचेंजने मुहूर्त ट्रेडिंगची वेळ जाहीर केलेली नाही. मुहूर्त ट्रेडिंगची वेळ नंतर सूचित करण्यात येईल. एक्सचेंज कोणत्याही सुट्ट्यांमध्ये बदल करू शकते, ज्यासाठी आगाऊ एक वेगळे परिपत्रक जारी करण्यात येईल.
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, बीएससी आणि एनएससी या दोन्ही एक्सचेंजवर इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज आणि SLB सेगमेंटमध्ये मुहूर्त ट्रेडिंग होईल. लवकरच एक्सचेंज मुहूर्त ट्रेडिंगची वेळ जाहीर करेल. दिवाळीपासून नवीन व्यवसायीक वर्षाची सुरूवात होते अशी सर्वसाधारण मान्यता आहे. दिवाळीतील मुहूर्त ट्रेंडिंगमुळे वर्षभर समृद्धी आणि संपत्ती येते अशी अनेकांची श्रद्धा आहे.