दहशतावद्यांनी अपहरणानंतर एक व्हिडिओ क्लिप जारी केली आहे. वरिष्ठ मंत्री अब्दुल्ला बेग यांचा तो व्हिडिओ आहे. इस्लामाबादहून गिलगिटला जात असताना दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचं समोर आलं आहे. दहशतवाद्यांनी त्यांच्या साथीदारांच्या सुटकेची मागणी केली आहे. दहशतवाद्यांनी रस्ता जाम करुन मंत्री आणि इतर पर्यटकांचं अपहरण केलं.
अब्दुल्ला बेग हे वित्त, उद्योग, वाणिज्य आणि श्रम विभागाचे मंत्री आहेत. इस्लामाबादहून गिलगिटला जाताना त्यांचं अपहरण करण्यात आलं आहे. दहशतवाद्यांनी साथीदारांच्या सुटकेसह महिलांच्या खेळामधील सहभागावर बंदी घालत इस्लामी कायदा लागू करण्याची मागणी केली आहे.
पाकिस्तानच्या लोकप्रतिनिधींनी प्रतिबंधित तरहीक-ए- तालिबान पाकिस्तान या संघटनेच्या वाढत्या कारवायांवरुन सूचक इशारा दिला होता. एका लोकप्रतिनिधीनं या संघटनेच्या वाढत्या कारवायांविषयी माहिती देखील मागवली होती. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सिनेटर रजा रब्बानी यांनी सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या मुद्याकडे सादिक संजरानी यांचं लक्ष वेधलं होतं. टीटीपीच्यासोबतच्या चर्चेची सद्यस्थिती यावर खासदार आणि जनतेला माहिती मिळावी, त्यांना विश्वासात घेतलं जावं, अशी मागणी करण्यात आली होती.