दोन्ही गटांसमोर नावासाठी आता कोणते पर्याय?
‘दोन्ही गटांना आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना नावच वापरता येणार नाही का, याबाबत यापूर्वीच्या अशा प्रकारणांमध्ये दिलेले निकाल अभ्यासावे लागतील. तसेच शिवसेना नावाच्या पुढे आणि मागे काहीतरी शब्द घालून ते दोन्ही गटांना वापरता येऊ शकतं,’ असं मत उज्ज्वल निकम यांनी मांडलं आहे.
ujjwal nikam news, ठाकरे आणि शिंदे हे पक्षासाठी कोणतं नाव वापरू शकतात? उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया – adv ujjwal nikam first reaction on which name uddhav thackeray thackeray and cm eknath shinde can use for the party
जळगाव : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा आणि शिवसेना हे नाव आगामी अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी वापरण्यास घातलेल्या बंदीच्या निर्णयावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गट निवडणूक आयोगाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात,’ असं मत निकम यांनी व्यक्त केलं आहे.