शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ”साठी शरद पवार यांनी मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा अखेरचा भाग आज प्रसिद्ध झाला. त्यात पवार यांनी महाराष्ट्रातील व देशातील अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. मोदी सरकारला पर्याय देण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.
वाचा:
राष्ट्रीय राजकारणात सध्या भाजपचं वर्चस्व असून विरोधी पक्ष विखुरलेला दिसत आहे. हा विरोधी पक्ष भविष्यात मोदी सरकारला आव्हान देऊ शकतो का, असा प्रश्न त्यांना विचारण्या आला. त्यावर विरोधी पक्षामध्ये ती ताकद निश्चित आहे असं ते म्हणाले. ‘खरंतर २०१९ च्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्यात चर्चा होऊन काही धोरणं ठरवण्यात आली. मात्र, नंतर करोनाच्या संकटामुळं पुढचं काम थांबलं,’ असं त्यांनी सांगितलं. ‘करोनाचं संकट दूर झालं आणि संसदेचं कामकाज सुरू झालं की पुन्हा एकत्र येण्याची भावना विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये आहे. आपण एकत्र आलं पाहिजे. एक सक्षम पर्याय दिला पाहिजे, असं सर्वांचंच मत आहे. हे सगळे पक्ष एकत्र येतील,’ असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.
वाचा:
‘विरोधी पक्षाचं ऐक्य होणार असेल तर मी त्यात अधिक लक्ष घालेन. त्यासाठी कोणालाही भेटायचं असेल तरी भेटेन. मला त्यात अजिबात कमीपणा वाटत नाही,’ असंही पवारांनी सांगितलं.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times