ठाणे, मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांतून तडीपार
गोठीवली गावात राहणारे मढवी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव रबाळे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक दुलवा ढाकणे यांनी ७ जुलै रोजी परिमंडळ-१च्या पोलिस उपायुक्तांकडे पाठविला. या प्रस्तावाची वाशी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त डी. टी. देवे यांनी प्राथमिक चौकशी करून मढ़वी यांना दोन वर्षांसाठी मुंबई उपनगरे ठाणे व रायगड या तीन जिल्ह्यांतून हद्दपार करण्याची शिफारस परिमंडळ या पोलिस उपायुक्तांकडे केली होती.
मढवी यांच्याविरोधात रबाळे पोलिस ठाण्यात ५०६ नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली. गणेशोत्सवात विसर्जनाच्या दिवशी मढवी यांच्यावर दंगलीसह मारामारीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावर शिंदे गटात समील करून घेण्यासाठी मला जाणूनबुजून पोलिस खोट्या गुन्ह्यात अडकवत आहे, असा आरोप मढवी यांनी केला. १५ सप्टेंबर रोजी त्यांचा जबाब नोंदवून ठा घेण्यात आला. त्यानंतर वाशी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त टेळे यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतील मुद्दे, या त्यांची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन ३० सप्टेंबर रोजीच्या हदपार त्यान आदेशान्वये त्यांना महाराष्ट्र पोलिस स्वात अधिनियम सन १९५१ कलम ५६ हेव (१) (अ) (ब) प्रमाणे ठाणे व ला मुंबई उपनगरे या दोन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी करण्यात आले आहे, अशी माहिती पानसरे यांनी दिली.
manohar madhavi, शिवसेनेला आणखी एक धक्का, शिंदे गटावर गंभीर आरोप करणारा नगरसेवक दोन वर्षांसाठी तडीपार – shiv sena leader manohar madhavi tadipar for 2 years from thane and mumbai suburban region
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: शिवसेनेचे ऐरोलीतील माजी नगरसेवक मनोहर कृष्णा मढवी (एम. के.) यांना अखेर नवी मुंबई पोलिसांनी ठाणे व मुंबई उपनगरे या जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. शुक्रवारीच या हद्दपारीची अंमलबजावणी करण्यात आली, अशी माहिती परिमंडळ-१चे पोलिस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.