अकोला : दुचाकीवर देवी विसर्जनासाठी जात असताना क्रूझर वाहनाची धडक लागल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार, तर २ जण जखमी झाले आहेत. जखमींना अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातात मित्राचा मृत्यू झाला याची बातमी समजतात त्याच्या साथीदारांनी घटनास्थळ गाठले आणि अपघाताला कारणीभूत ठरलेल्या क्रूझर वाहनाला पेटवून दिले. काल शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अकोला अकोट मार्गावरील वल्लभनगर गावाजवळ ही घटना घडली.

काय आहे संपूर्ण घटना ?

अकोला शहरातील अकोट फैल भागात असलेल्या मच्छी मार्केट परिसरातील महाकाली मंडळातील देवी विसर्जनसाठी काल शनिवारी रात्री रवाना झाली. दरम्यान, या मंडळातील तीन युवक आपल्या दुचाकीने जात होते, वाटेतच त्यांचा दुर्देवी अपघात झाला. एका क्रुझर वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. २२ वर्षीय सूरज उर्फ पिंटू नंदाने (राहणार अकोट फाईल मच्छी मार्केट, अकोला) असं अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. तरीही त्यांचे अधिकृत नावे हेच आहेच की नाही हे अद्याप पर्यंत कळू शकले नाहीये. तर दुचाकीस्वार असलेले सूरज इंगळे व दिवे मेश्राम हे दोघे मित्र गंभीर जखमी झाले.

मनसेचा नेता म्हणतो, ‘उद्धव ठाकरेंकडे एक मोठा गुण आहे, जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही’
या तिघांनाही उपचारार्थ सरकारी रुग्णालयात दाखल केले असता यातील सुरजला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान सुरज उर्फ पिंटू याचा मृत्यू झाला हे समजताच त्याच्या दोन मित्रांनी घटनास्थळ गाठले. यावेळी अपघातीस कारणीभूत ठरलेले क्रुझर वाहन रस्त्यावर उभी दिसले. त्यानंतर संतप्त असलेल्या दोन्ही मित्रांनी क्रूझर वाहन पेटवून दिले आणि तिथून पळ काढला. ही घटना अकोट अकोला मार्गावर घडली असून वल्लभनगर येथील ग्रामस्थांच्या ही आग निदर्शनास येतात त्यांनी लागलीच आगीवर पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. अशी माहिती दहीहंडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच अकोट फैल पोलीस आणि दहीहंडी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. आणि सुरजचा याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात दहीहंडा पोलीस ठाण्यात वाहन जाळणाऱ्या दोन लोकांवर आणि क्रुझर वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती कळताच गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले, परंतु पोलिसांचे वाहन रस्त्यातच अचानक बंद पडले होते. जखमींना आणि मृतकाला ऑटो रिक्षामध्ये न्यावे लागले. या घटनेने अकोला शहरात शोककळा पसरली आहे.

निवडणूक आयोगाचा ठाकरेंना धक्का; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; दोन शब्दांत इरादा स्पष्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here