election commission freezes shiv sena party symbol: पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्यात आल्यानं ठाकरे आणि शिंदे गटासमोर नवं आव्हान निर्माण झालं आहे. दोन्ही गट कोणतं नाव आणि चिन्ह निवडणार याबद्दल राज्याला उत्सुकता आहे. दोन्ही गटांना शिवसेना नाव वापरता येणार नाही. मात्र त्यांना शिवसेनेशी संबंधित नाव वापरता येईल.

धनुष्यबाण गोठलं; मग आता कोणतं चिन्हं?
दोन गट एकाच चिन्हावर दावा सांगतात, तेव्हा निवडणूक आयोग ते चिन्हच गोठवतो असा इतिहास आहे. ठाकरे आणि शिंदे गटाला याची कल्पना होती. त्यामुळेच त्यांनी दसरा मेळाव्यातून नव्या चिन्हाबद्दल संकेत दिले. शिंदेंनी बीकेसीमधील मेळाव्याची सुरुवात तलवार पूजनानं केली. व्यासपीठासमोर असलेल्या जागेत ५१ फूट लांब तलवारीची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. शिंदे गटाच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना १२ फूट लांबीची चांदीची तलवार भेट म्हणून दिली. तर ठाकरे गटानं गदा शिवतीर्थावरील मेळाव्यात शस्त्रपुजनावेळी गदेचा वारंवार उल्लेख केला. त्यामुळे त्यांचं चिन्ह गदा असू शकतं.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.