मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामामुळं धारावीत नियंत्रणात आल्याच्या भाजपच्या प्रचाराची शिवसेनेनं जोरदार खिल्ली उडवली आहे. ‘काही चांगले घडले की ते आमच्यामुळे. रेड्याला रेडकू झाले आमच्यामुळे, वाळवंटात हरभरा टरारून वर आला तरी तो आमच्यामुळेच, असं म्हणण्यासारखा हा प्रकार आहे. संकटसमयी हे सगळं यांना सुचतं तरी कसं?,’ असा अत्यंत बोचरा सवाल शिवसेनेनं केला आहे. (Shivsena attacks BJP Leaders in )

वाचा:

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी समजल्या जाणाऱ्या मुंबईतील धारावीत करोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं राज्य सरकार व महापालिका प्रशासनाचं कौतुक केलं आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धारावीकरांसह सर्वांचे आभार मानले आहेत. मात्र, हे श्रेय केवळ सरकारचं आरएसएसनंही इथं अहोरात्र काम केलंय, असा दावा भाजपचे काही नेते व आमदारांनी केला आहे. आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून त्यांच्यावर तोफ डागण्यात आली आहे. ‘धारावीच्या निमित्तानं आरएसएसच्या नावानं नवा प्रचारी फंडा राबवला जातोय. हा जरा अतिरेकच आहे. पांढऱ्या कपड्यांतील देवदूतांचा अपमान आहे,’ असा आरोप शिवसेनेनं केलाय.

वाचा:

‘संघाचे काम चांगले नाही असे कोणी म्हणणार नाही, पण धारावीतील करोना नियंत्रणाच्या कार्यात सर्वच यंत्रणांनी मेहनत घेतली आहे. हे यश सामुदायिक आहे, मात्र त्यातही मुंबई महापालिकेचे काम मोठे आहे हे तुम्ही मान्य करणार की नाही? दिल्ली, उत्तर प्रदेश, पुणे, पिंपरी-चिंचवड वगैरे भागांत स्वयंसेवकांचे अस्तित्व आहे, मग तेथे संघ धारावीप्रमाणे दक्ष का नाही? त्यामुळे संघाला करोना युद्धात उगाच ओढण्याचे कारण नाही. प्रत्येक जण आपापल्या कुवतीने लढतो आहे,’ असंही अग्रलेखातून सुनावण्यात आलं आहे.

करोना कसा जाईल तेवढेच सांगा, प्रवचने नकोत!

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते हे सध्या राज्यभर दौरे करून कोरोना संकटाची माहिती करून घेत आहेत व कोरोनाशी लढताना सरकार कसे अपयशी ठरले आहे यावर रोज प्रवचने झोडत आहेत. त्यापेक्षा त्यांनी एकदा संपूर्ण पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम पाहायला हवे,’ असा टोला शिवसेनेनं हाणला आहे. ‘करोना हे शंभर वर्षांतले सर्वात मोठे संकट आहे अशी नवी दुर्मिळ माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी दिली आहे. करोनामुळे उत्पादन, नोकऱ्या तसेच आरोग्यावर अभूतपूर्व असा नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला आहे, असेही दास म्हणतात. या सगळ्या नकारात्मक परिणामांतून जनता सध्या जात आहे. त्यातून सुटका कशी होईल तेवढेच सांगा साहेब. आता प्रवचने नकोत,’ असंही शिवसेनेनं म्हटलंय.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here