औरंगाबाद: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा हादरा बसला आहे. एवढेच नव्हे तर आगामी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना (Shivsena) हे नाव वापरण्यासही ठाकरे गट आणि शिंदे गटाला मज्जाव करण्यात आला आहे. आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्यापाठोपाठ आता पक्षाचे चिन्हही हातातून गेल्याने शिवसेना कधी नव्हे इतक्या मोठ्या संकटात सापडली आहे. या सगळ्या घडामोडी सुरु असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप नेत्यासोबत कारमधून एकत्र प्रवास केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवण्यात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांचा भाजप नेत्यासोबतचा प्रवास चर्चेचा विषय ठरत आहे.

शरद पवार आणि भाजपचे खासदार रावसाहेब दानवे रविवारी औरंगाबादमध्ये एकत्र दिसून आले. यावेळी शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. या प्रवासादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सद्य राजकीय परिस्थितीवर काही चर्चा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रतिस्पर्धी पक्षातील राजकीय नेते हे अनेकदा एकाच वाहनाने किंवा विमानाने प्रवास करणे, ही नवी बाब नाही. तरीही सध्या अनेक राजकीय उलथापालथी सुरु असल्याने शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांचा एकाच गाडीतून झालेला हा प्रवास सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.
ठाकरे, शिंदेंमध्ये नवा वाद; दोन्ही गटांचा सेम नावावर क्लेम; कुरघोडीच्या राजकारणात कोणाचा गेम?

शरद पवारांचं शिवसेनेबाबत भाकीत

निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. उलट असा काही निर्णय होईल, याची माल खात्री होती. पण चिन्ह असो किंवा नसो शिवसेनेने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. चिन्ह गोठवल्यामुळे शिवसेना संपणार नाही. तिथली तरुण पिढी आणखी जोमाने उभी राहील आणि आपली शक्ती वाढवेल. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) आहे. या निर्णयाचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
आमचं चिन्ह… मिलिंद नार्वेकरांचं लक्षवेधी ट्विट; धनुष्यबाण गोठवल्यानंतर ठाकरे गटाचं ठरलं?

शिवसेनेसाठी धनुष्यबाण इतका महत्त्वाचा का?

शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेला धनुष्यबाणाचे चिन्ह पूरक असेच होते. त्याआधी म्हणजे १९६८ मध्ये शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ढाल तलवार या चिन्हावर लढवली होती. १९८० च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळाले होते. तर १९८५च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मशाल, सूर्य, बॅट-बॉल अशी वेगळी चिन्हे मिळाली होती. १९८९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पहिल्यांदा धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. १९८९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पहिल्यांदा धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. गेली ३३ वर्षे धनुष्यबाण हा शिवसेनेची ओळख आहे. १९८९ नंतरच्या सर्व निवडणुका शिवसेनेने धनुष्यबाणावर लढवल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here