Authored by विकास दळवी | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 9, 2022, 12:29 PM

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या सहाय्यक अभियंतासह कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

Hingoli Crime News
वीज बिल भरेनात, कामगार लाईन कापायला गेले; सहाय्यक अभियंता, कंत्राटी कर्मचाऱ्यास बेदम मारहाण

हायलाइट्स:

  • सहाय्यक अभियंतासह कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण
  • दोघेही वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेले होते
  • हिंगोली येथील औंढा तालुक्यातील धक्कादायक घटना
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या सहाय्यक अभियंतासह कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी काल शनिवारी रात्री उशिरा औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ उपविभागाचे सहाय्यक अभियंता निरज रणवीर व कंत्राटी कर्मचारी शफीयोद्दीन खतीब हे शनिवारी थकबाकीदार वीज ग्राहकांकडे वसुलीसाठी गेले होते. यावेळी ते यजमान निवासच्या बाजूला असलेल्या कैलास पाचमासे यांच्या हॉटेलकडेही गेले. यावेळी त्यांनी पाचमासे याला सुमारे सव्वा आठ हजार रुपयांची थकबाकी भरण्यास सांगितले. मात्र, त्याने थकबाकी भरण्यास पैसे नसल्याचे सांगत त्यांना परत जाण्यास सांगितले.

IND vs SA : करो या मरो सामन्यासाठी भारत सज्ज, नामुष्की टाळण्यासाठी संघात मोठे बदल
या प्रकरणात सहाय्यक अभियंता रणवीर यांनी कर्मचारी शफीयोद्दिन यांना वीज पुरवठा खंडित करण्याबाबत सांगितले. त्यावरुन शफीयोद्दिन हे खांबावर चढत असताना कैलास पाचमासे यांचा मुलगा व्यंकटेश पाचमासे व पत्नी सुनिता पाचमासे यांनी त्यांना मारहाण केली, तसेच रणवीर यांनाही मारहाण झाली. या प्रकरणी सहाय्यक अभियंता रणवीर यांच्या तक्रारीवरुन तिघांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

एकनाथ शिंदे इन ऍक्शन! नाव, चिन्हाबद्दल मोठा निर्णय होणार; दुपारच्या बैठकीनंतर डाव टाकणार?

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here