जम्मू-काश्मीरमधील पर्वतरांगांमध्ये देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांसाठी ७८ वर्षांच्या पद्मिनी जोग यांनी खास मिशन हाती घेतलं होतं. जोग यांनी त्यांचं मिशन पूर्ण केलं आहे. १२ हजार ३०० फूट उंचीवर देशाच्या सुरक्षेशी डोळ्यात तेल घालून पहारा देणाऱ्या जवानांना जोग यांनी प्राणायाम शिकवला.

सप्टेंबरच्या शेवटच्या दोन आठवड्यांत जोग यांनी कुपवाड्यात जवानांना प्राणायाम शिकवला. पद्मिनी जोग गेल्या २ दशकांपासून जवानांसाठी मोफत प्राणायाम वर्ग घेत आहेत. १७ ते २८ सप्टेंबर दरम्यानही त्यांनी जवानांना प्रशिक्षण दिलं. कुपवाड्यात त्यांनी घेतलेलं प्रशिक्षण शिबिर विशेष महत्त्वाचं ठरलं. कारण त्यांचे पती कर्नल प्रताप जोग यांनी १९६५ आणि १९७१ च्या युद्धात मोलाचं योगदान दिलं. दोन्ही युद्धात प्रताप जोग यांचा सहभाग होता.
माझ्या आयुष्यातलं हे ध्येय होतं, असं जोग यांनी सांगितलं. मी डोंगराळ भागात प्रवास करू शकते. जवळपास दररोज प्रशिक्षण शिबिरं घेऊ शकते, असं जोग म्हणाल्या. नागूपरच्या जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळात १९८० च्या दशकात जोग यांनी प्रशिक्षण घेतलं. २००५ मध्ये त्यांनी हरिद्वारला जाऊन रामदेव बाबांकडून योग साधनेतील पुढील प्रशिक्षण घेतलं. यानंतर त्यांनी लष्करी शाळा, संस्थांमध्ये मोफत शिबिरं घेण्यास सुरुवात केली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.