Pune Crime News : पुण्यात एका व्यावसायिकाचे २० कोटींसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुण व्यावसायिकाकडून २० कोटी रुपयांची खंडणी मागून त्याचे अपहरण करण्यात आले.

हायलाइट्स:
- २० कोटींसाठी तरुण व्यावसायिकाचे अपहरण
- व्यावसायिकाची पोलिसांनी केली सुखरूप सुटका
- पुण्यातील धक्कादायक प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर मार्केटमधील व्यवहारातील पैशांवरुन अपहरण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार यांची शेअर मार्केट व्यवहाराची कंपनी आहे. या कंपनीत हेमंत पाटील यांनी चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तक्रारदार यांची कंपनी डबघाईला आल्याने परतावा देता आला नाही. पाटील याने वारंवार चार कोटींच्या बदल्यात २० कोटींची मागणी केली. थोड्या दिवसात चार कोटी रुपये देतो किंवा जमीन नावे करून देतो, असे तक्रारदाराने सांगितले.
हेमंत पाटील याने २० कोटींसाठी पप्पू घोलपला तक्रारदाराकडे पाठवले. हे पैसे तक्रारदार यांच्याकडून मिळवून देण्यासाठी गजा मारणे टोळी यामध्ये सहभागी झाली. त्यांनी शुक्रवारी दुपारी या व्यावसायिकाचे कात्रज परिसरातून अपहरण केले. त्याच्याकडे २० कोटींची खंडणी मागितली. खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे व त्यांच्या पथकाला हा प्रकार समजला. पोलिसांनी शोध घेऊन शनिवारी दुपारी व्यावसायिकाची सुटका केली. त्याचवेळी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.