मुंबई: शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह पक्षाच्या दोन्ही गटांना वापरता येणार नाही, असा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगानं काल दिला. धनुष्यबाणावर दोन्ही बाजूंनी दावा सांगितल्यानं ते चिन्ह निवडणूक आयोग गोठवेल, असा अंदाज होता. ठाकरे गटानं तशी तयारीदेखील केली होती. मात्र आयोगानं शिवसेना नाव न वापरण्याचा निर्णय देत शिंदे गटालाही धक्का दिला. त्यामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं प्रचाराची तयारी केली आहे. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या ऋतुजा लटके यांना काँग्रेस, राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आहे. लटके यांच्यासमोर भाजपचे मुरजी पटेल यांचं आव्हान असेल. आता या निवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवारही असू शकतो. त्यामुळे तिरंगी लढत पाहायला मिळू शकते.
आज ते विधान खरं ठरतंय! शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवला; आनंद भाजपच्या पोटात माईना; ट्विट चर्चेत
अंधेरीतील पोटनिवडणूक भाजप लढत असल्यानं शिंदे गटानं या ठिकाणी उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय बदलण्याची शक्यता आहे. आपण शिवसेना, धनुष्यबाणावर दावा करत आहोत. तर अंधेरीतील पोटनिवडणूक आपण लढवायला हवी, अशी शिंदे गटातील आमदारांची भूमिका आहे. शिंदे गटाच्या आमदारांची आज संध्याकाळी बैठक होत आहे. त्या बैठकीत याबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. याबद्दलचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील.

शिंदे गटाला अंधेरीतील पोटनिवडणूक लढायची असल्यास त्यांच्यासाठी स्थानिक समीकरणं आणि ताकद महत्त्वाची असेल. शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार, पदाधिकारी प्रामुख्यानं ग्रामीण भागातील आहेत. मुंबईत ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलेलं नाही. मुंबईतील पदाधिकारी अद्यापही ठाकरेंसोबतच आहेत. त्यामुळे शिंदे गटाला पोटनिवडणूक लढवायची असल्यास या मुद्द्यांचा विचार करावा लागेल.
आमचं चिन्ह… मिलिंद नार्वेकरांचं लक्षवेधी ट्विट; धनुष्यबाण गोठवल्यानंतर ठाकरे गटाचं ठरलं?
मतं फोडून भाजपला अप्रत्यक्ष मदत?
शिवसेनेनं २०१४ मध्ये अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ जिंकला. २००९ मध्ये ५ हजार मतांनी पराभूत झालेल्या सेनेच्या लटकेंनी २०१४ मध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश शेट्टींचा पराभव केला. विशेष म्हणजे यावेळी शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर होते. तर भाजपचे सुनील यादव दुसऱ्या स्थानावर आहेत. ही निवडणूक शिवसेना, भाजपं स्वतंत्रपणे लढवली होती.

२०१९ मध्ये रमेश लटकेंनी जागा राखली. यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांचा पराभव केला. लटके यांना ६२ हजार ७७३ मतं मिळाली. तर पटेल यांनी ४५ हजार ८०८ मतं घेतली. आता पटेल भाजपचे उमेदवार आहेत. लटकेंच्या पत्नी आणि मुरजी पटेल यांच्यात थेट लढत झाल्यास शिवसेनेचं पारडं जड असेल. पण चिन्ह गोठवल्यानं अडचण होऊ शकते. या ठिकाणी शिंदेंनी उमेदवार दिल्यास शिवसेनेची मतं विभागली जातील. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here