Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 9, 2022, 2:58 PM
Thane News : पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना आज सकाळी घडली आहे. खाणीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे.

हायलाइट्स:
- पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू
- खाणीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची ही दुसरी
- डोंबिवलीच्या भोपरमध्ये खदानीत घडली घटना
डोंबिवली जवळील भोपर गावातल्या गावदेवी मंदिरामागील खाणीत आयरे गावातील सहा मित्र पोहायला गेले होते. खाणीच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडायला लागले. बुडतानाचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी खाणीजवळ धाव घेतली. यावेळी चार मित्रांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले.
मात्र, दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाला असून आयुष केदारे आणि आयुष गुप्ता अशी दोन मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. या खाणीत आधीही काही लोक बुडाल्याने स्थानिकांच्या मागणीवरून प्रशासनाकडून खाणीजवळ जाऊ नये, असा फलक लावून सुरक्षा रक्षक नेमला होता. मात्र, आता या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
आमचं चिन्ह ठरलं! धनुष्यबाण गोठवल्यानंतर ठाकरेंच्या निष्ठावंतांची घोषणा
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.