Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस यांनी धनुष्यबाण गोठविल्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मला आश्चर्यकारक काहीच वाटत नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतल्या अंधेरी पूर्वची निवडणूक महिनाभरावर असल्याने यावर निर्णय होणं गरजेचं होतं. निवडणूक आयोग ज्यावेळी अंतिम निर्णय देईल त्यावेळी एकनाथ शिंदे यांची बाजू वरचढ ठरेल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

 

Devendra fadanvis and Uddhav Thackeray11
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना धक्का,
  • धनुष्यबाण गोठवल्यानंतर फडणवीस हसत हसत म्हणाले…
मुंबई : शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला तसेच या दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही.आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता ठाकरे, शिंदे गटाने केली होती. शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे? या प्रकरणाबाबतची निवडणूक आयोगासमोरील पुढील सुनावणी आता येत्या सोमवारी, १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. तत्पूर्वी राजकीय वर्तुळात या मोठ्या घडामोडींवर प्रतिक्रिया सुरुच आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनुष्यबाण गोठविल्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मला आश्चर्यकारक काहीच वाटत नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.

“मला या प्रकरणी काहीच आश्चर्य वाटत नाही. कारण गेल्या २०-२५ वर्षामध्ये जेव्हा जेव्हा असे वाद झाले त्या त्या वेळी निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय देण्यापूर्वी अंतरिम निर्णय देताना त्या-त्यावेळच्या दोन्ही गटांची चिन्ह गोठवणं आणि नाव गोठवण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या प्रोसेसनंतर अंतिम निर्णय देणं अशीच आयोगाची कार्यपद्धती राहिली आहे”, अशी बोलकी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुंबईतल्या अंधेरी पूर्वची निवडणूक महिनाभरावर असल्याने यावर निर्णय होणं गरजेचं होतं. निवडणूक आयोग ज्यावेळी अंतिम निर्णय देईल त्यावेळी एकनाथ शिंदे यांची बाजू वरचढ ठरेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दुसरीकडे मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचाही फडणवीसांनी समाचार घेतला. नोटबंदीनंतर मोदींचं नाणं संपलं, आपल्याकडे बाळासाहेबांसारखं खणखणीत नाणं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “नोटबंदीनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपने जोरदार विजय मिळवले. अगदी मोदींच्या नावावर आणि फोटो त्यांचाच लावत शिवसेनेने निवडणूक लढवली, त्यातूनच १८ खासदार आणि त्यांचे ५६ आमदार निवडून आले. त्यामुळे मोदींचं नाणं हे खणखणीत आहे”

उद्धव ठाकरेंचा आज फेसबुक संवाद

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट यांच्यात सुरू असलेल्या युद्धातील पहिल्या मोठ्या लढाईत उद्धव यांना शनिवारी रात्री मोठा हादरा बसला. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा अंतरिम निकाल निवडणूक आयोगाने दिला. त्याचसोबत दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. या सगळ्या मोठ्या घडामोडींनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here