Uddhav thackeray Live : शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला तसेच या दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत आहेत.

 

Shiv Sena Supremo Uddhav Thackeray Facebook Live Over Election Commission Decision Shiv Sena Symbol Freeze
उद्धव ठाकरे (शिवसेना पक्षप्रमुख)

हायलाइट्स:

  • मिंधे गटाचा भाजप पुरेपुर वापर करत आहे
  • त्या ४० जणांचा वापर झाला की फेकून देतील
  • निष्ठा ही विकत घेता येत नसते, हे परवाच्या मेळाव्यात दिसलं-ठाकरे
मुंबई : ४० डोक्याच्या रावणाने रामाचं धनुष्यबाण गोठवलं. गोठलेल्या रक्ताची माणसंच असं कृत्य करु शकतात. उलट्या काळजाच्या माणसांनी आईच्या काळजात कट्यार घुसवली. ज्या शिवसेनेने मोठं केलं, त्याच शिवसेनेचा घात केला. कारस्थानी लोकांनी बाळासाहेबांचं धनुष्यबाण गोठवलं. धनुष्यबाण गोठल्याचा आनंद महाशक्तीला आता होत खूपच असेल, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवला.

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला तसेच या दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत आहेत. निवडणूक आयोगाचा निकाल आम्हाला अपेक्षित नव्हता. पण शिवसेना संकटांना घाबरणारी नाही. शिवसेना नेटाने उभी राहिल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे म्हणाले…

मिंधे गटाचा भाजप पुरेपुर वापर करत आहे
त्या ४० जणांचा वापर झाला की फेकून देतील
निष्ठा ही विकत घेता येत नसते, हे परवाच्या मेळाव्यात दिसलं
तुमचा हेतू शिवसेना संपवण्याचा आहे.
काँग्रेसनेही शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला नाही.
तुमची बुद्धी गोठली नसेल तर, बाळासाहेबांचं नाव वापरु नका.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here