मुंबई : आज देखील अनेक जण भेटतात म्हणतात तुम्ही आमच्या कुटुंबामधील एक सदस्य आहात. आज पुन्हा फेसबुकच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. गद्दारी झाली मुख्यमंत्री पद सोडले तेव्हा पण आपण संवाद केला. सगळं देऊनही गद्दार गेले आता जरा अती होऊ लागलंय. मलाच मुख्यमंत्री व्हायचयं इथपर्यंत ठिक होतं, आता शिवसेनाप्रमुख व्हायला चालले.

दसरा मेळाव्यात विघ्न आणले पण आपला मेळावा झालाच. दोन मेळावे झाले अस म्हणतात एकीकडे पंचतारांकित तर दुसरीकडे निष्ठावंतांचा मेळावा. पण आपल्या मेळाव्याला दिव्यांग, नेत्रहीन सगळे शिवसैनिक होते त्यामुळे त्यांना धन्यवाद करतो. तुम्ही आलात ते का? कारण उध्दव बाळासाहेब ठाकरे म्हणून तुम्ही आलात. १९ जून १९६६ तो काळ आजही आठवतो. घरी मराठी माणसांची वर्दळ होती, मार्मिक होते वाचा आणि थंड बसा हे तेव्हाचे सदर. आजोबांनी बाळासाहेबांना विचारलं की, काही संघटना, पक्ष वगैरे काढायचे ठरवलंय का? बाळासाहेबांनी उत्तर दिलं हो, त्यावर आजोबांनी नाव दिलं ‘शिवसेना’. काही दिवसानंतर एक दिवस एक तगडा माणूस दारात उभा राहिला ते म्हणजे दत्ताजी साळवी त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं की, मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला आहे, मला शिवसेनेत यायचं आहे. काही नसतांना लोक जुळत गेली. काहीच नव्हत केवळ महाराष्ट्राच्या हितासाठी केलं.

Uddhav Thackeray : ४० डोक्याच्या रावणाने रामाचं धनुष्यबाण गोठवलं, ठाकरेंचा शिंदेंवर बाण
अनेक जणांनी जीव पण गमावले, तुरुंगवास सोसला, पोलिसांशी संघर्ष केला त्यातून शिवसेना नावाचं महावृक्ष उभं राहिलं. काल निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह धनुष्य बाण गोठवलं. चाळीस डोक्यांच्या रावणांनी ते चिन्ह गोठवलं. या लोकांच्या वृत्तीची मला चीड आहे. उलट्या काळजाच्या लोकांनी आईच्या काळजात कट्यार घुसवली. पण याचा आनंज त्यांच्या मागच्या महाशक्तीला जास्त होत असेल त्यांना उकळ्या फुटत असतील. कारण त्यांना हे जमलं नाही म्हणून ते शिवसेनेचे लोकं फोडून आनंद घेत आहेत. या देशात हिंदू म्हणायची हिम्मत दिली तीच शिवसेना त्यांनी गोठावली काय आनंद मिळवला? तुमचा आणि शिवसेनेचा संबंध काय? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. शिवसेना माझ्या आजोबांनी नाव दिलंय आणि बाळासाहेबांनी ते नाव रुजवलं.

या ४० जणांचा उपयोग झाला की यांना फेकून देतील. मला खात्री आहे सगळेच काही स्वार्थी नाहीत हे दसरा मेळाव्यात सिध्द झालं. इंदिरा गांधीनी जे केलं नाही ते तुम्ही केलंय. तेव्हाही त्रास झालाच पण तेव्हा काँग्रेसचे सरकार होते आज भाजपचे मग जे काँग्रेसने केलं नाही ते तुम्ही करतायेत. ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांना छळताहेत. मी डगमगलेलो नाही, माझा आत्मविश्वास आहे, तुमच्या सारखे शिवसैनिक आहेत तुम्ही डगमगायचं नाही. माझं आजही आव्हान आहे समोर या निवडणुकांना सामोरे या. तुम्हाला सगळं पाहिजे पण बाळासाहेबांचा मुलगा नकोय.

दरम्यान, काही काळासाठी पक्षाचं चिन्ह गोठवलं आहे. मला हा निकाल अनपेक्षित होता, १६ आमदारांचा निकाल लागेपर्यंत आयोगाचा निर्णय व्हायला नको होता. माझा कायद्यावर विश्वास आहे. तिथे न्याय मिळेल अशी खात्री आहे आपण तीन चिन्ह दिली आहेत त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल. तीन नावे दिली आहेत, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आदेशाप्रमाणे चिन्ह आणि नाव दिलंय लवकरात लवकर आम्हाला नाव द्यावे, अशी विनंती देखील उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

दरम्यान, आपण दिलेले पर्याय आयोगाने जाहीर केले पण गद्दारांनी काय दिलंय ते अद्याप सांगितलेलं नाही. जनता सर्वोच्च आहे, आम्हाला त्यांच्या दरबारात जायचं आहे म्हणून निवडणूक आयोगाने लवकरात लवकर आम्हाला चिन्ह आणि नाव द्यावे. आज कोजागिरी आहे रात्र वैऱ्याची आहे जागृत राहा. आज वेळ निघून गेली की कुणी आपल्याला हरवणार नाही.

शिंदे – ठाकरेंच्या भांडणात भाजपला लाभ? धनुष्यबाण गोठवल्यानं कमळ फुलण्याची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here