चंद्रपूर जिल्ह्याला यंदाच्या खरीप हंगामात सहा वेळा पुरानं धडक दिली.या पुरानं सर्वाधिक नुकसान शेतीचं केलं. नदी,नाल्या काठावरील कापूस,सोयाबीन पिकं भुईसपाट झालीत.दुबार,तिबार पेरणी वाया गेली.अखेर बळीराजानं शेतात मिरची लावली मात्र शेवटचा पुरानं ती ही गिळली.यातून कसंबसं वाचलेलं शेत पीक बळीराजासाठी आशादायक ठरलं.मात्र परतीच्या पावसानं बळीराजाचा आशेवर पाणी फेरलं आहे. ऐन दिवाळीत निघाणाऱ्या सोयाबीन पिकाचं परतीच्या पावसानं मोठं नुकसान केलं.
झाडावर असलेल्या सोयाबीनच्या शेंगाना अंकूर फुटला आहे.या प्रकारानं बळीराजा पुरता खचला आहे.अतिवृष्टी,पुरामुळं नुकसान झालेल्या शेतीची अद्याप भरपाई मिळालेली नाही. त्यामुळं सरकार काही मदत करेल,ही आशाही बळीराजाला नाही. ऐन दिवाळीत पैसा हातात देणाऱ्या पिकाचं नुकसान बघून बळीराजा खचला आहे,हवालदिल झाला आहे.
नदी,नाल्या काठावरील शेतीचं सर्वाधिक नुकसान
जिल्ह्यात वर्धा,वैनगंगा,इरई,अंधारी आणि उप नद्यांनी वेढा दिला होता.या नद्यांना मिळणाऱ्या लहान-मोठ्या नाल्यांची संख्या मोठी.या नद्यांना पूर आल्याने नदीकाठावरील शेती पाण्याखाली गेली. पुरामुळं नाल्यांना डाब मारला.नाल्यांचे पात्रही फुगले. या नाल्यांनी शेतीचं मोठं नुकसान केलं.
पूरस्थिती,अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची अद्याप भरपाई मिळालेली नाही.आता परतीचा पावसानं नुकसान केलं.बळीराजावर संकटाची मालिका सुरु आहे.काही दिवसावर दिवाळी आली आहे.मदत मिळाली नाही तर ही दिवाळी बळीराजासाठी अंधारमय ठरेल, असं शेतकरी प्रविण मेश्राम यांनी म्हटलंय.