सोलापूर : महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्यात शिवभोजन योजनेंतर्गत रोज 1800 थाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ही योजना राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियु्क्त करण्यात आली असून, महापालिकेचे आयु्क्त समितीचे सदस्य, तर जिल्हा पुरवठा अधिकारी सदस्य सचिव असतील.
तीन महिन्यांसाठी असेल योजना
प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या तीन महिन्यांसाठी ही योजना असेल. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता त्याचा विस्तार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी किमान एक भोजनालय सुरु करण्यात येईल. दहा रुपयांत उपलब्ध होणाऱ्या या भोजनामध्ये दोन चपात्या, वरण, भाताचा समावेश असेल.