शनिवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पेडर रोड येथे हा प्रकार घडला. एका दाम्पत्यामध्ये भर रस्त्यातच राडा झाला. तिशीतला एक तरुण काळ्या रंगाच्या कारमध्ये एका महिलेसह चालला होता. याच कारच्या पाठीमागून सफेद रंगाच्या कारमधून एक महिला आली. तिनं स्वत:ची गाडी ओव्हरटेक करून पुढची काळी कार अडवली. काळ्या कारमध्ये असलेला तिशीतला तरुण हा तिचा पती होता. गाडीतून उतरताच तिनं आपल्या नवऱ्याला बाहेर येण्यास सांगितलं. तो येत नसल्यानं संतापलेली ती महिला कारच्या बोनेटवर जाऊन बसली. काचावर ठोसे मारू लागली. या सगळ्या गोंधळात एका लेनवर वाहतुकीची पुरती कोंडी झाली.
घटनास्थळी असलेल्या वाहतूक पोलिसांनी तिला परोपरीनं समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती आपल्या नवऱ्याचा पिच्छा सोडत नव्हती. शेवटी तिचा नवरा कारमधून उतरला. तो उतरताच तिनं त्याला लाथ घातली. दोघांमध्ये काहीतरी बोलणं झालं आणि दोघेही तिच्या कारमध्ये जाऊन बसले. नवरा सोबत आल्यानंतरही या महिलेचा राग शांत झाला नाही. ती गाडीतून उतरून पुन्हा काळ्या रंगाच्या कारजवळ गेली आणि गाडीतील महिलेशी बाचाबाची करू लागली. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
वाचा:
वाचा:
सार्वजनिक ठिकाणी कार सोडून वाहतुकीची कोंडी केल्याबद्दल पोलिसांनी संबंधित महिलेला ई-चलान पाठवले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times