मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे विक्रोळीतील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या स्विमिंग पूलमध्ये १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह तरंगत होता. ६ ऑक्टोबरला तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. या घटनेमध्ये अखेर या हत्येचं गूढ उकललं आहे.

या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत सुमित राजेश जांबळे हा कोल्हापूरचा रहिवासी असून तो नुकताच विक्रोळी (पूर्व) इथे मामा संदेश जाधव यांच्या घरी राहण्यासाठी आला होता. अशात बांधकामाधीन इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने पावसाच्या पाण्याने भरलेल्या तलावात एक मृतदेह तरंगत असल्याचे पोलिसांना सांगितले. हा मृतदेह सुमित जांबळे याचा असल्याची स्थानिकांनी ओळख पटवली. डोक्याला, खांद्याला आणि हाताला त्याला गंभीर दुखापत झाली.

आज, उद्या मेघगर्जनेसह पाऊस?, मुंबईला ‘यलो अलर्ट’ जारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकामाधीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रक्ताचे डाग आढळून आले आहेत, त्यामुळे त्याला मारहाण करून खाली फेकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्या मित्रांनी सांगितले की, मृताचे एका मुलीशी संबंध होते, जिच्या एक्स प्रियकराने संदेशला दूर राहण्याचा इशारा दिला होता. यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि हा मृत्यूचा थरार घडला.

पोलिसांनी स्थानिकांशी चर्चा केली असता मृत व्यक्तीला अखेरचं ५ ऑक्टोबर रोजी नवरात्रीच्या कार्यक्रमात दांडिया खेळताना पाहिले होते. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. संदेशने सांगितले की, मयत आणि संशयित यांच्यात व्हॉट्सअॅप चॅट होते, ज्यामध्ये नंतर त्याला धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी तरुणी आणि संशयिताचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

उच्च रक्तदाबाची ‘ही’ गोळी खाणं लगेच थांबवा, फार्मा कंपनीच्या निर्णयामुळे भीती वाढली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here