मुंबई : अमेरिकी चलन, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. सोमवारी भारतीय चलन आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचला असून आता एका डॉलरची किंमत ८२.६८ रुपये इतकी झाली आहे. तर आज सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया ३८ पैशांनी कमजोर झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ, यूएस ट्रेझरी यिल्डमध्ये वाढ (ज्याला भारतात बाँड म्हणतात), परकीय चलन साठा कमी होणे आहे. त्यामुळे आता आता प्रश्न असा आहे की रुपयाच्या घसरणीचा तुमच्यावर किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? ते समजून घेऊया.

आठवड्याच्या सुरुवातीला निर्देशांकांत घसरण; सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात उघडला, रुपया आणखी खड्ड्यात
आंतरराष्ट्रीय पातळीवर अनिश्चिततेच्या काळात लोक सुरक्षित आश्रयस्थान शोधतात आणि डॉलर त्यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत परकीय गुंतवणूकदार विक्री करतात तेव्हा परकीय चलनाच्या साठ्यावर परिणाम होतो आणि डॉलरची मागणी वाढते, तर रुपयासह इतर चलनांची मागणी कमी होते.

महागाईचा दणका
रुपया कमजोर झाल्यामुळे देशात महागाई वाढणार आहे. खरं तर, भारत आपल्या ७० टक्क्यांहून अधिक पेट्रोलियम उत्पादने आयात करतो, ज्याची आयात डॉलरमध्ये होते. अशा परिस्थितीत रुपया कमजोर झाल्याने भारताला आयातीसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या महागड्या आयातीमुळे तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवू शकतात.

डिजिटल रुपया म्हणजे नेमकं काय, क्रिप्टोपेक्षा कसा आहे वेगळा?

इंधनाचे दर वाढले तर मालवाहतुकीचे शुल्क देखील वाढेल. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या की मालवाहतुकीचे शुल्कही वाढते असे सर्वसाधारणपणे दिसून येते. या अतिरिक्त शुल्कामुळे कंपन्यांचे किंवा व्यवसायाचे मार्जिन कमी होऊन ते ग्राहकांकडून वसूल केले जाईल, ज्यासाठी उत्पादनाची किंमत वाढवली जाईल.

दुसरीकडे, भारत खाद्यतेल आणि कडधान्येही मोठ्या प्रमाणावर आयात करतो. रुपयाच्या घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेतील खाद्यतेल आणि डाळींच्या किमतींवर पडू शकतो आणि त्याचे दर वाढू शकतात. याशिवाय परदेशातून आयात होणाऱ्या सर्व उत्पादनांवर कमी-अधिक प्रमाणात त्याचा परिणाम दिसून येईल. त्याचबरोबर रुपयाच्या घसरणीमुळे परकीय चलनाचा साठाही कमकुवत होईल.

महागड्या व्याजदराने हैराण झालात; जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त कर्ज
परदेश प्रवास आणि शिक्षण महागणार
रुपयाच्या कमजोरीमुळे तुम्हाला परदेशात फिरायला जाणे किंवा अभ्यास करणे महाग होईल. रुपयाचे मूल्य कमकुवत झाल्याने जेव्हा तुम्ही परदेशी प्रवास किंवा अभ्यासासाठी खर्च कराल, तेव्हा तुम्हाला स्थानिक चलनासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील. याशिवाय परदेशातून कोणत्याही प्रकारची सुविधा घेतल्यास त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील.

कोठे मिळणार फायदा
मात्र, रुपया कमजोर झाल्याचा फायदा निर्यातदारांना मिळणार आहे. जेव्हा त्यांना परदेशातून पेमेंट मिळेल, ते भारतीय चलनात रूपांतरित होते म्हणजेच ते पूर्वीपेक्षा जास्त असेल.

कारण काय
देशांतर्गत शेअर बाजारात विक्रीचा कल सुरू असण्याव्यतिरिक्त डॉलरच्या मजबूतीमुळे भारतीय रुपया कमजोर होत आहे. जगातील सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक ०.८९ टक्क्यांनी वाढून १०६.०७ वर पोहोचला. त्याचवेळी ब्रेंट क्रूड फ्यूचर्स, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे मानक १.१० टक्क्यांनी घसरून ११२.२५ डॉलर प्रति बॅरलवर आले. रुपया कमकुवत होण्यामागे हे देखील एक मोठं कारण ठरत आहे. याशिवाय, देशांतर्गत आर्थिक आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिल्याने रुपयाही मंदावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here