मुंबई : डेंग्यू आणि मलेरियानंतर आता मुंबईकरांना आणखी एका आजाराचा सामना करावा लागत आहे. मुंबईत डोळे येण्याची साथ (eye-conjunctivitis) पसरली आहे. मुंबईतील अनेक भागात लोकांना याचा सामना करावा लागत आहे. पाणीदार डोळे, लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत आणि डोळ्यांच्या संसर्गाचा सामान्यतः एका डोळ्यावर परिणाम होतो. मात्र, एका डोळ्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होत आहे. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

घरगुती उपायांसह वेळेवर घ्या डॉक्टरांचा सल्ला…

वातावरणातील बदलामुळे मुंबईकरांना आधीच विषाणूजन्य आजारांनी ग्रासले आहे. अशात आता मुंबईकरांना डोळ्यांच्या संसर्गाने ग्रासले आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांनी घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला वैद्यकीय विभागाकडून दिला जात आहे. या प्रकारच्या डोळ्यांच्या जळजळाची काही लक्षणे मुंबईकरांना दिसत आहेत. त्यामुळे कोणताही घरगुती उपाय न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले.

उच्च रक्तदाबाची ‘ही’ गोळी खाणं लगेच थांबवा, फार्मा कंपनीच्या निर्णयामुळे भीती वाढली

काय उपाय करायचे…

डोळ्यांना संसर्ग झाल्यास स्पर्श करणे टाळा, स्वच्छ पाण्याने डोळे वारंवार धुवा, शक्यतो प्रवास टाळा, इतरांपासून दूर राहा, डोळ्यांना हात न लावता रुमाल वापरा. तेलकट पदार्थ खाऊ नका आणि कोणतेही घरगुती क्लिनर वापरू नका. घरगुती उपायांचा अवलंब न करता वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

भारतातील कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीने ६६ मुलांचा जीव घेतला? WHO कडून मेडिकल अलर्ट जारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here