Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 10, 2022, 12:20 PM
Maharashtra Sangli news | जत तालुक्यातील बिळुर येथील सुनीता माळी या कपडे धुण्यासाठी मुलींसह गावाजवळील तलाव परिसरात गेल्या होत्या. तुकाराम चंद्रकांत माळी हे गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या सुतार फाटा जवळ राहतात. घराजवळच त्यांची शेती असून लगतच लिंगनूर तलाव आहे. रविवारी सकाळपासून त्यांची पत्नी सुनीता व तीन मुली बेपत्ता होत्या.

हायलाइट्स:
- मायलेकींचा दुर्दैवी अंत
- रविवारी सकाळपासून या चौघी बेपत्ता होत्या
सुनिता तुकाराम माळी (वय २७), अमृता तुकाराम माळी (वय १३), अंकिता तुकाराम माळी (वय १०), ऐश्वर्या तुकाराम माळी (वय ७) असे मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. ही घटना सोमवारी रात्री १ वाजता निदर्शनास आली. रात्री उशीरा या चौघींचेही मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आले. पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील बिळुर येथील सुनीता माळी या कपडे धुण्यासाठी मुलींसह गावाजवळील तलाव परिसरात गेल्या होत्या. तुकाराम चंद्रकांत माळी हे गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या सुतार फाटा जवळ राहतात. घराजवळच त्यांची शेती असून लगतच लिंगनूर तलाव आहे. रविवारी सकाळपासून त्यांची पत्नी सुनीता व तीन मुली बेपत्ता होत्या. दिवसभर शोधाशोध करूनही चौघीही सापडल्या नाहीत. त्यांनी सासरवाडी कोहळी (ता. अथणी) येथेही विचारणा केली. त्यानंतर त्यांनी जत पोलिसांत बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली.
पोलीस, ग्रामस्थ व नातेवाईक यांनी शोधाशोध केल्यानंतर तलावात चौघींचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. सोमवारी रात्री एक वाजता चौघींचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेबद्दल बिळुर भागात उलट सुलट चर्चा सुरू होती. तपास जत पोलीस करत आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.