नवी दिल्ली : जगातील पहिल्या १० श्रीमंतांच्या यादीत उपस्थित असलेल्या सर्व अब्जाधीशांना शनिवारी मोठं नुकसान सोसावे लागले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्समध्ये ८ ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार श्रीमंतांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतील सर्व श्रेष्ठांच्या संपत्तीत शनिवारी घट झालेली दिसून आली. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या संपत्तीत सर्वात मोठी घट झाली असून त्यांनी एका दिवसात सुमारे १०.३ अब्ज डॉलर गमावले. यामुळे त्यांची संपत्ती २१० अब्ज डॉलरवर घसरली आहे. मस्क यांच्या संपत्तीत या वर्षात आतापर्यंत ६०.३ अब्ज डॉलरची घट झाली आहे.

अदानींची नवीन खेळी! ACC-Ambuja नंतर आणखी एक सिमेंट कंपनी अधिग्रहित करणार
एकटे अदानींच्या संपत्तीत भर
गौतम अदानी यांच्या संपत्तीतही २.११ अब्ज डॉलरची घट झाली आहे, ज्यामुळे त्यांची नेटवर्थ एकूण १२५ अब्ज डॉलर झाली आहे. मात्र, या वर्षी त्यांची संपत्ती ४८.७ अब्ज डॉलरने वाढली आहे. जगातील पहिल्या १० श्रीमंतांच्या यादीतील व्यक्तींच्या संपत्तीत वाढ नोंदवणार अदानी हे एकमेव आहेत. अलीकडेच ते जगातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते मात्र, आता तो जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. जगभरातील शेअर बाजाराच्या तडाख्यात फसून कोट्याधीशांच्या संपत्तीत घट नोंदवण्यात आली आहे. टेस्ला, अदानी ग्रुप (समूह) आणि रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घट होताना दिसत आहे, ज्यामुळे उद्योगपतींची संपत्ती कमी होत आहे.

अंबानींच्या संपत्तीतही घट
मुकेश अंबानींच्या संपत्तीत शनिवारी ९३.७ मिलियन डॉलरची घट झाली. यासह त्यांची संपत्ती ८३.६ अब्ज डॉलरवर घसरली आहे. या वर्षात आतापर्यंत त्यांच्या संपत्तीत ६.४० अब्ज डॉलरची घट झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी सध्या जगातील श्रीमंतांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत.

बाजारातील मंदीचा अदानींना धक्का, श्रीमंतांच्या यादीतमोठा फेरबद्दल; अंबानी टॉप-१० मधून बाहेर
जगातील दुसरे आणि तिसरे श्रीमंत
जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या ॲमेझॉनचे जेफ बेझोस यांचे एका दिवसात ५.९२ बिलियन डॉलर (जवळपास ४९ हजार कोटी रुपये) नुकसान झाले आहे. बेझोस यांची एकूण संपत्ती १३७ अब्ज डॉलरवर आली आहे. याशिवाय जगातील तिसरे सर्वात मोठे श्रीमंत फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अरनॉल्ट यांची संपत्ती ४.८५ अब्ज डॉलरने (४० हजार कोटी रुपये) कमी होऊन १३१ अब्ज डॉलरवर आली आहे.

श्रीमंतांच्या यादीत आणखी एक अदानी; रोज कमावतात १०२ कोटी, संंपत्ती पहाल तर डोळे दिपावतील
बिल गेट्सची संपत्तीही घटली
जगातील पाचव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांची संपत्ती २.६५ अब्ज डॉलरने घसरून १०६ अब्ज डॉलरवर आली आहे. त्याचवेळी, सहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत वॉरेन बफे यांची संपत्ती २.२९ अब्ज डॉलरने घटून ९४.२ अब्ज झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here