Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित दीक्षित | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 10 Oct 2022, 3:45 pm
Maharashtra Politics | याठिकाणी भुमरे साहेब सुध्दा आलेले आहेत. मात्र, विरोधीपक्षनेते दानवे साहेब आणि भुमरे साहेब या दोघांना जावं लागले. आता स्वाभाविक आहे, की रोजगार हमीचं मंत्रिपद त्यांच्याकडे असल्यामुळे, जास्त वेळ कुठंही एका ठिकाणी बसता येणं शक्य नाही. मात्र, ते देखील याठिकाणी अभिष्टचिंतन करायला इथं आले. सत्तेत असलेले दानवे साहेब देखील आलेले आहेत. आणि विरोधीपक्षात असलेले दानवे साहेब सुद्धा आलेले आहेत.

हायलाइट्स:
- शिवाजीदादा पंडित यांच्या ८५व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात धनंजय मुंडेंची फटकेबाजी
- दादांना हा महाराष्ट्र भीष्मपितामह का म्हणतो ?
यावेळी धनजंय मुंडे यांनी म्हटले की मी अनेक मान्यवरांची भाषणं ऐकली, तशी ती वाचली होती. मात्र, आपण सगळ्यांनी ती ऐकली. तसं काही कुणाच्या भाषणांवर बोलायचं नाही, इथं सगळेच आलेले आहेत. म्हणजे सत्तेत असलेले दानवे साहेब देखील आलेले आहेत. आणि विरोधीपक्षात असलेले दानवे साहेब सुद्धा आलेले आहेत, म्हणजे हे दोघेही वनवे आहेत, अशी टिप्पणी धनंजय मुंडे यांनी केली.
ते पुढे बोलताना म्हणाले की, याठिकाणी भुमरे साहेब सुध्दा आलेले आहेत. मात्र, विरोधीपक्षनेते दानवे साहेब आणि भुमरे साहेब या दोघांना जावं लागले. आता स्वाभाविक आहे, की रोजगार हमीचं मंत्रिपद त्यांच्याकडे असल्यामुळे, जास्त वेळ कुठंही एका ठिकाणी बसता येणं शक्य नाही. मात्र, ते देखील याठिकाणी अभिष्टचिंतन करायला इथं आले, असा चिमटा धनंजय मुंडे यांनी काढला. त्याचबरोबर सर्वांचे भाषण ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं, कदाचित प्रत्येकांच्या कार्यालयातून दादांच्या बाबतीत एक वाक्यदेखील वेगळं लिहिलेलं नाही, तशाला तशी स्क्रिप्ट आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. त्यांचा रोख कुणाकडे ?, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला.
तर माझ्या दृष्टीने शिवाजीदादांची खासियत काय ? माझ्या दृष्टीने दादांना हा महाराष्ट्र भीष्मपितामह का म्हणतो ?… तर एकदा का दादांनी टोपी कुणाच्या विरोधात काढली तर पुन्हा तो माणूस उठत नाही. दरम्यान दादांचे एक स्वप्न अधुरे आहे, ते आपण विजयराजेंना २०२४ च्या निवडणुकीत निवडून देऊन पूर्ण करु. तेव्हाच खऱ्या अर्थाने दादांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा ठरतील, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.