Ramesh Walunj Family : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वांद्रे येथील दिवंगत शिवसैनिक रमेश वाळुंज यांच्या पत्नी कल्पना वाळुंज आणि त्यांचे कुटुंबीय मातोश्रीवर दाखल झाल्या होत्या. उद्धव ठाकरे आणि कल्पना वाळुंज यांच्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली.

 

Ramesh Walunj Family members meet Uddhav Thackeray
कल्पना वाळुंज आणि कुटुंबीय उद्धव ठाकरेंच्या भेटीला
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २१ सप्टेबंर रोजी गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसैनिकांच्या कार्याचा उल्लेख केला होता. उद्धव ठाकरेंनी रमेश वाळुंज यां शिवसैनिकांचा उल्लेख केला होता. रमेश वाळुंज यांनी समुद्रात वाहून जाणाऱ्या मुलींचा जीव वाचवला पण त्यांचा तिसऱ्या मुलीला वाचवताना मृत्यू झाला होता, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. आज रमेश वाळुंज यांच्या पत्नी कल्पना वाळुंज यांच्यासह त्यांची मुलगी आणि मुलानं उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते अनिल परब देखील उपस्थित होते.


उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वाळुंज कुटुंब मातोश्रीवर

मुंबईतील गट प्रमुखांचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांनी मुंबईकरांसाठी काय काय केलं याची माहिती दिली. शिवसेनेच्या काही शिवसैनिकांची उदाहरण देखील त्यांनी दिली होती. वांद्रे येथील शिवसैनिक रमेश वाळुंज यांनी समुद्रात बुडणाऱ्या तीन पैकी दोन मुलींना वाचवलं होतं. तिसऱ्या मुलीला वाचवताना रमेश वाळुंज यांचा मृत्यू झाला होता. उद्धव ठाकरेंनी भाषणात उल्लेख केल्यानंतर रमेश वाळुंज हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला होता. मात्र, तो दावा रमेश वाळुंज यांच्या कुटुंबीयांनी फेटाळून लावला होता. आज रमेश वाळुंज यांच्या पत्नी कल्पना वाळुंज आणि त्यांची मुलगी, मुलगा उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here