या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्री करण्यात येणाऱ्या वाहतूक बंदीबाबत प्रशासनाकडून नागरिकांना कल्पना देण्यासाठी प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. सर्व नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी व शासनास सहकार्य करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
Home Maharashtra chandani chowk flyover, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; चांदणी चौकातील वाहूतक अर्ध्या तासासाठी बंद...
chandani chowk flyover, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; चांदणी चौकातील वाहूतक अर्ध्या तासासाठी बंद ठेवण्यात येणार – important news for citizens of pune the road in chandni chowk will be closed for half an hour today
पुणे : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील रस्ता आज मध्यरात्री अर्धा तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सर्विस रोडचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी खडकामध्ये सुरूंग लावण्याचं काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होईपर्यंत आज रात्री १२.३० ते १.०० या कालावधीत अर्ध्या तासासाठी चांदणी चौक येथील सर्व बाजूची वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.