मुंबई : भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील विरोधी पक्ष आहेत. पण राजकारणात कोणीही शत्रू नसतो, असे म्हटले जाते. हीच गोष्ट आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. कारण आता शरद पवार आणि आशीष शेलार हे निवडणूकीसाठी एकत्र आले आहेत.

शरद पवार आणि आशीष शेलार कशासाठी एकत्र आले, पाहा…
राजकारणात गेम आणि खेळात राजकारण काही नवीन नाही. खेळातील राजकारण करण्यासाठी आता शरद पवार आणि आशीष शेलार हे दोघेही पुढे सरसावले आहेत. कारण आता या दोघांना खुणावते आहे ती मुंबई क्रिकेट असोसिसएशनची निवडणूक. येत्या काही दिवसांमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी आता शरद पवार व आशीष शेलार एकत्र आले आहेत.

शरद पवार आणि आशीष शेलार कोणत्या कारणांसाठी एकत्र आले आहेत, जाणून घ्या…
शरद पवार यांनी यापूर्वी मुंबईपासून ते आयसीसीपर्यंत सर्वच संघटनांची अध्यक्षपदं भूषवली आहेत. पण वयाच्या नियमामुळे त्यांना आता निवडणूक लढवता येणार नाही. शरद पवार हे राष्ट्रवादीच्या एखाद्या नेत्याला अध्यक्षपपदासाठी उभे करू शकले असते, पण त्यांना वगळता अन्य कोणत्याही नेत्याकडे दांगडा अनुभव नाही. आशीष शेलार हे बऱ्याच कालावधीपासून मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना मुंबई क्रिकेट असोसिशनमध्ये नेमकं काय करायचं हे सांगावं लागणार नाही आणि कोणत्याची कचाट्यात ते अडकणार नाही.

mca list

गेल्या टर्मममध्ये विजय पाटील हे मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते. त्यामुळे आता आपला अध्यक्ष बसवून मुंबई क्रिकेट संघटनेवर सत्ता आणण्याचा शरद पवार यांचा मानस आहे. त्याचबरोबर येत्या काही वर्षांमध्ये भारतात विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे विश्वचषकातील सामने मुंबईमध्ये खेळवण्याचाही प्रयत्न त्यांना करता येऊ शकतो. २०११ साली झालेल्या विश्वचषकाची फायनल ही मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाली होती. त्यामुळे यापुढेही जर जोर लावला तर कदाचित विश्वचषकाची फायनलही मुंबईत खेळवली जाऊ शकते. मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षरदासाठी संदीप पाटीलही उत्सुक आहेत. पण संदीप पाटील हे शरद पवार यांचे किती ऐकतील हे सांगता येत नाही. त्यामुळे शरद पवार यांना संदीप पाटील यांच्यापेक्षा आशीष शेलार हे कधीही जवळचे वाटतील. मुंबई क्रिकेट संघटना ही भारतातील सर्वात मोठी आणि मानाची समजली जाते. त्यामुळे या संघटनेवर पुन्हा एकदा आपली सत्ता राखण्यासाठी शरद पवार उत्सुक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here