नवी दिल्ली: ऑनलाईन शॉपिंगमध्ये सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला आश्चर्यकारक वाटतील अशाही गोष्टी ऑनलाइन खरेदी केल्या जातात. पण, या सगळ्यात ब्रिटनमधून गेल्या काही दिवसांपासून एक अतिशय आश्चर्यकारक घटना समोर येत आहे. इथे मानवी अवशेषांची ऑनलाइन विक्री होत असल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये मानवी कवटी आणि हाडं यांचा समावेशही आहे.

गुपचूप जुन्या कबरी खोदल्या जात आहेत

किंबहुना त्याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे या अवशेषांसाठी तिथे गुपचूप जुन्या कबरी खोदल्या जात आहेत आणि त्यातून मानवी अवेशेष काढले जात आहेत. म्हणजेच हे सर्व दरोडेखोरांकडून केले जात आहे. लाइव्ह सायन्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये याबाबत सविस्तर माहिती दिली असून, दरोडेखोर असे का करत आहेत, याचीही माहिती दिली आहे.

हेही वाचा –

कवटी आणि हाडे काढली जात आहेत

तपासात असे आढळून आले की अनेक लोकांमध्ये मानवी अवशेषांचा कल वाढला आहे. ते घरात हे अवशेष सजवून ठेवत आहेत. यासाठी काही गट तयार करण्यात आले असून जुनी कबर खोदून पुरलेल्या मृतदेहांची कवटी आणि हाडं काढण्यात येत आहेत. फेसबुक आणि इतर सोशल साईटवर त्याची विक्री सुरु असल्याची माहिती आहे. विकत घेण्याची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत वाढली आहे.

हेही वाचा –

त्यामुळे या उत्पादनांची मागणी वाढल्याने पुरवठा वाढणे आवश्यक आहे. लाइव्ह सायन्सला त्यांच्या शोधात आढळले की केस आणि कवटी देखील काही ऑनलाइन पोस्टद्वारे विकली जात आहेत. या सर्व गोष्टींचा कल आगामी काळात आणखी वाढू शकतो, असा अंदाज सध्या तरी वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here