Live अपडेट्स…
>> (सविस्तर वृत्त वाचण्यासाठी करा क्लिक)>> पाहा व्हिडिओ- सचिन पायलट यांच्यासाठी पक्षाचे सर्व दरवाजे खुले- रणदीप सुरजेवाला-
>> जयपूर- सचिन पायलट यांची पक्ष कार्यालयातून काढलेले पोस्टर्स पुन्हा लावण्यात आले
>> मुख्यमंत्री यांचे शक्तिप्रदर्शन, प्रसारमाध्यमांना दाखवला आमदारांचा पाठिंबा
>> १२ काँग्रेसचे आमदार आणि अपक्ष ३ आमदार सचिन पायलट यांच्या संपर्कात- सूत्रांची माहिती.
>> राजस्थानात जे काही सुरू आहे, त्याला राहुल गांधी हेच जबाबदार आहेत- भाजप नेत्या उमा भारती यांचा आरोप.
>> मी जयपूरला जाणार नाही- सचिन पायलट
>> मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा बहुमताचा दावा खोटा- सचिन पायलट
>> जयपूर: बैठकीसाठी १०२ आमदार पोहोचल्याची मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची माहिती.
>> राजस्थानातील सरकार जनतेच्या सेवेसाठी काम करत राहणार- रणदीप सुरजेवाला.
>> अजूनही सुरू होऊ शकली नाही काँग्रेस आमदारांची बैठक
>> राजस्थानात काँग्रेसचे सरकार सुरक्षित- काँग्रेस आमदारांनी केला दावा.
>> सचिन पायलट यांना पक्षाचे दरवाजे खुले आहेत, त्यांनी पुढे येऊन त्यांची बाजू पक्षासमोर मांडावी- काँग्रेस.
>> गेल्या ४८ तासात काँग्रेस श्रेष्ठींचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याशी अनेकदा चर्चा झाली- सुरजेवाला
>> गेल्या २४ तासात काँग्रेस आमदारांशी अनेकदा बोलणे झाले आहे- रणदीप सुरजेवाला.
>> भारतीय जनता पक्षाचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत- रणदीप सुरजेवाला
>> भारतीय जनता पक्षाने कितीही प्रयत्न केले, ईडी, सीबीआय, आयकर विभागाचा वापर केला तरी देखील राजस्थानचे सरकार पडणार नाही- सुरजेवाला.
>> कुटुंबातील व्यक्ती नाराज असेल तर ती कुटुंब पाडून टाकत नाही- रणदीप सुरजेवाला
>> काँग्रेसच्या कार्यालयातून सचिन पायलट यांची छायाचित्रे हटवली.
>>
(क्लिक करा आणि वाचा सविस्तर वृत्त)
>> जयपूर- काँग्रेस आमदारांच्या बैठकीत एकूण ९० आमदारांची उपस्थिती.
>> सचिन पायलट यांना अतिशय कमी आमदारांचा पाठिंबा- गहलोत समर्थक आमदाराचा दावा.
>> काँग्रेस आमदारांच्या बैठकीत आतापर्यंत ६० आमदारांची उपस्थिती
>> उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या विरोधात होणार कारवाई- काँग्रेसची प्रतिक्रिया
>> काँग्रेस आमदारांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री सचिन पायलट आलेच नाहीत.
>> जयपूरमध्ये सकाळी साडे दहा वाजता मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी वाजता सुरू होणार काँग्रेस आमदारांची बैठक
>> धर्मेंद्र राठोड, राजीव अरोडा यांच्या निवासस्थानांवर आयकर विभागाचे छापे
>> मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानांवर आयकर विभागाचे छापे
>> लवकरच सुूरू होणार काँग्रेसच्या आमदारांची बैठक
>>
>> सचिन पायलट जर भारतीय जनता पक्षात जात असतील तर ते पाप करत आहेत- राजस्थान परिवहन मंत्र्यांचे वक्तव्य.
>> अशोक गहलोत हे मुख्यमंत्रिपदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवत आहेत- भारतीय जनता पक्षाचे नेते ओम माथुर यांचे टीकास्त्र.
>> रघुवीर मीणा हे पायलट यांची जागा घेण्याचे शक्यता, बनू शकतात राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष.
>> काँग्रेस आमदारांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री सचिन पायलट जाणार नाहीत, काँग्रेसही मन वळवणार नाही.
>> काँग्रसने आज सकाळी ११ वाजता बोलावली सर्व आमदारांची बैठक… व्हीपही केला जारी.
>> राजस्थान काँग्रेसने आपल्या आमदारांसाठी व्हिप जारीकेला . राजस्थान सरकार पूर्णपणे सुरक्षित असल्याचा राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष अविनाश पांडे यांचा दावा.
>> काँग्रसचे नेते रणदीप सुरजेवाला, अजय माकन आणि अविनाश पांडे हे रात्री उशिरा राजस्थानात पोहोचले.
>> आज मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची काँग्रेसच्या सर्व आमदारांसोबत आज पुन्हा होणार बैठक
>> उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपल्यासोबत ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा केला दावा.
>> पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही- पत्रकार परिषदेत कांग्रेसने केला दावा.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times