मुंबई : शिवसेनेची स्थापना जरी १९६६ साली झाली असली तरी १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पहिल्यांदा धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. गेली ३३ वर्षे धनुष्यबाण शिवसेनेची ओळख होती. १९८९ नंतरच्या सर्व निवडणुका शिवसेनेने धनुष्यबाणावर लढवल्या. शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेला धनुष्यबाणाचे चिन्ह पूरक असेच होते. पण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला हादरा देऊन पक्ष फोडला. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हावर शिंदेंनी दावा सांगितल्यानंतर ठाकरेंनी त्यांच्या दाव्याला आव्हान दिलं. हा सगळा वाद पुढे न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या दारात गेला. निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवला. आज दोन्ही गटांच्या पर्यायांचा विचार करुन निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर ‘मशाल’ चिन्ह दिलं. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिलं गेलंय. उद्यापर्यंत शिंदे गटाला चिन्हासंदर्भात प्राधान्यक्रम देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

तत्पुर्वी शिवसेनेला मिळालेलं ‘मशाल’ चिन्ह त्यांच्यासाठी अजिबातच नवं नाहीये. मशाल आणि शिवसेनेचं नातं फार जुनं आहे. शिवसेना पूर्वी नोंदणीकृत पक्ष नव्हता. त्यामुळं शिवसेनेला १९८९ मध्ये धनुष्यबाण चिन्ह मिळालं होतं. त्यापूर्वी शिवसेनेच्या उमेदवारांची नोंद अपक्ष म्हणून व्हायची. १९८५ साली छगन भुजबळ हे मशाल चिन्हावर विधानसभेत विजयी झाले होते. तर, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सेना पुरस्कृत पहिला खासदार देखील मशाल चिन्हावर निवडून आला होता.

‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव शिंदे गटाला तर ठाकरेंना मशाल चिन्ह, निवडणूक आयोगाचा निर्णय काय?
आज शिवसेनेला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर सेनेचे तत्कालिन नेते छगन भुजबळ यांचा एक फोटो व्हायरल होतोय. ज्यामध्ये डाव्या बाजूला भुजबळांचा फोटो आहे तर उजव्या बाजूला मशाल चिन्ह आहे. मुंबई महापालिका गाजवल्यानंतर विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या भुजबळांनी माझगावच्या मतदारांना आवाहन करताना मशालीसोबतचं पत्रक छापून लोकांना भावनिक साद घातली होती.

छगन भुजबळ म्हणाले होते….

शिवसेना प्रमुख, मा. बाळासाहेब ठाकरे यांनी १९७२ साली माझगांव विभागातून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मला उभे केले. जनतेने मला निवडूनही दिले. १९७८ साली महापालिकेची दुसरी निवडणूक झाली. पहिल्या पांच वर्षाच्या माझ्या कामाची पोचपावती म्हणून मतदार बंधु-भगिनींनी माझ्या मतांच्या पेटया भरभरुन टाकल्या आणि अनेक रथी-महारथी विरोधकांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. एवढे प्रेम व जिकाळा माझगांवच्या जनतेने मला दिला आहे. या जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मी कसोशीने प्रयत्न केला.

या कालखंडामध्ये आपल्या भागातील नागरिकांना विविध सुविधा देण्याचा मी यशस्वी प्रयत्न केला. माझ्या चाहत्यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेत याची चित्रमय झलक आपण पहालच. महानगरपालिका सभागृहात विविध समस्यांवर भी आवाज उठविला. त्याच बरोबर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात वेळोवेळी उद्भवलेल्या अनेक प्रश्नांचा उहापोह केला. मग तो रॉकेल टंचाई अमी की बेळगांव कारवार प्रश्न असो, किया गिरणी कामगारांचा प्रश्न असो, किंवा “बॉम्बे” ऐवजी “मुंबई” हे नांव प्रचारात आणण्याचा प्रश्न असो. अशा विविध प्रश्नांना मी महापालिकेच्या माध्यमातून तसेच सार्वजनिक व्यासपिठावरून वाचा फोडली आहे. माशी ही भरीव कामगिरी पाहून मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी मला महापालिका शिवसेना गटाचा नेता नेमले. मुंबई महानगरपालिकेनेही माझ्या कार्याचा गौरव म्हणून अनेक महत्वांच्या संस्थांवर माझी नियुक्ती केली, इतकेच नव्हे तर तीन मुंबई महानगरपालिकेचा प्रतिनिधी म्हणून मला परदेशी अभ्यासदौयावर पाठविले.

बेळगांव-कारवार सीमा प्रश्न, बस भाडे वाढ, दूधभाव बाद अशा अनेक जन आंदोलनात अग्रभागी राहून मी प्रसंगी कारावासाची शिक्षा भोगली. अशा प्रकारे केवळ नागरी सुख-सोयी बाबतच नव्हे तर समाजातील अन्य विनय कार्यामध्ये मी सक्रीय भाग घेतला. म्हणूनच शिवसेनेने माझगांव विभागातून विधान सभेकरिता माझी उमेदवारी जाहीर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here