कोल्हापूर: धारावीच्या करोना मुक्तीचं श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देणाऱ्या भाजपच्या नेत्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते यांनी बिनतोड सवाल केला आहे. ‘संघाच्या स्वयंसेवकांनी अहोरात्र काम करून धारावी करोनामुक्त केली असेल तर संघाचे मुख्यालय जिथं आहे, त्या नागपुरात करोनाचा कहर कसा? तिथं संघाचे कार्यकर्ते नाहीत का,’ अशी विचारणा शेट्टी यांनी केली आहे.

वाचा:

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावीत करोना आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आलं आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं () राज्य सरकार व महापालिका प्रशासनाच्या कामाला दाद दिलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धारावीकरांसह सर्वांचे आभार मानले आहेत. मात्र, हे श्रेय केवळ सरकारचं नाही, आरएसएसनंही इथं अहोरात्र काम केलंय, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह काही नेते, आमदारांनी केला आहे. त्यावरून राजकीय टीका-टिप्पणीला सुरुवात झाली आहे.

वाचा:

शेट्टी यांनीही या वादात उडी घेतली आहे. ‘खरंतर धारावीत जेव्हा करोनाचा उद्रेक झाला होता, किड्या मुंग्याप्रमाणे माणसं मरत होती, तेव्हा आरएसएसचे कार्यकर्ते मदत करताहेत किंवा जीव धोक्यात घालून काम करताहेत अशी कुठलीही बातमी कुठेही वाचनात किंवा पाहण्यात आलं नाही. मात्र, धारावीतील परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सांगताच सगळे श्रेय घेण्यासाठी पुढं आले,’ असा टोला शेट्टी यांनी चंद्रकात पाटलांचं नाव न घेता हाणला.

वाचा:

‘आरएसएसचं मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये सुद्धा करोनाचा हाहाकार आहे. तिथं संघाचे कार्यकर्ते आहेत की नाही माहीत नाही. कारण मी कोल्हापूरच्या बाहेर गेलेलो नाही. इचलकरंजीतही करोनाचा हाहाकार आहे. अनेक शहरांत आहे. तिकडंही संघ स्वयंसेवकांनी जावं. संपूर्ण महाराष्ट्रात करोना निर्मूलनाचं काम करावं. महाराष्ट्र नक्कीच त्यांना आशीर्वाद देईल,’ असा चिमटाही शेट्टी यांनी काढला.

वाचा:

शिवसेनेनं आजच्या सामनाच्या अग्रलेखातून याच मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘काही चांगले घडले की ते आमच्यामुळे. रेड्याला रेडकू झाले आमच्यामुळे, वाळवंटात हरभरा टरारून वर आला तरी तो आमच्यामुळेच, असं म्हणण्यासारखा हा प्रकार आहे. हे सगळं यांना संकटसमयी सुचतं तरी कसं?,’ असा बोचरा सवाल शिवसेनेनं केला आहे.

दरम्यान, यावर प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी धारावीत काम केलेल्या संघाच्या कार्यकर्त्यांची यादीच शेट्टी यांना पाठवतो, असे सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here